
चालू घडामोडी | केंद्र सरकारने जनगणना 2027 चे शुभंकर लॉन्च केले

Government Launch Mascots for Census 2027
Subject : GS - भूगोल - लोकसंख्या, जनगणना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जनगणना 2027 (Census 2027) साठी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत शुभंकरांची (Mascots) नावे कोणती ?
1. शक्ति आणि विकास
2. उन्नती आणि समृद्धी
3. प्रगती आणि विकास
4. जन आणि गण
उत्तर : प्रगती आणि विकास
📰 बातमी काय ?
• केंद्रीय गृहमंत्र्यांनी नवी दिल्ली येथे जनगणना 2027 साठी ‘प्रगती’ आणि ‘विकास’ हे अधिकृत शुभंकर (Mascots) सादर केले.
• तसेच जनगणना प्रक्रियेसाठी विविध डिजिटल साधनांचे (Digital Tools) सॉफ्ट-लाँचही करण्यात आले.
हे शुभंकर नेमकं काय आहे आणि याचा उद्देश काय ?
• सरकारने जनगणना 2027 साठी ‘प्रगती’ (महिला गणनाकर्मी) आणि ‘विकास’ (पुरुष गणनाकर्मी) हे दोन शुभंकर तयार केले आहेत.
• मुख्य उद्देश : शुभंकरांच्या माध्यमातून 2027 च्या जनगणनेशी संबंधित माहिती, उद्दिष्टे आणि महत्त्वाचे संदेश समाजाच्या विविध घटकांपर्यन्त प्रभावी आणि नागरिक-स्नेही पद्धतीने पोहोचवले जातील.
👉 हे शुभंकर " स्त्री-पुरुष समान सहभाग " आणि “ विकसित भारत 2047 ” या संकल्पनेचे प्रतीक आहेत.

📊 जनगणना 2027 कशी वेगळी आहे ?
• ही जनगणना काही महत्त्वाच्या बाबींमुळे विशेष ठरते.
👉 ही जगातील सर्वात मोठी जनगणना प्रक्रिया असेल, ज्यात सुमारे 30 लाख कर्मचारी सहभागी होतील.
👉 भारतात प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने जनगणना केली जाणार आहे. म्हणजेच कागदी पद्धतीऐवजी मोबाईल अॅप आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरले जातील.
👉पहिल्यांदाच स्व-गणनेचा पर्याय याद्वारे नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन भरता येईल (Self-enumeration).
• उदाहरणार्थ- आपण स्वतःच आपली घराची माहिती पोर्टलवर भरू शकतो.
⚙️ जनगणनेची प्रक्रिया कशी असेल ?
• ही जनगणना दोन टप्प्यांमध्ये होईल-
1. पहिला टप्पा → घरांची परिस्थिती आणि घरगुती सुविधांवरील डेटा गोळा केला जाईल.
2. दुसरा टप्पा → देशातील प्रत्येक व्यक्तीची लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक आणि आर्थिक माहिती नोंदवली जाईल.
• जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात जातीशी संबंधित प्रश्न देखील समाविष्ट केले जातील.
💻 डिजिटल साधने :
जनगणना 2027 साठी काही नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहेत:
1. Houselisting Block Creator → सॅटलाईट इमेज वापरून नकाशे तयार करण्यासाठी
2. Mobile App → गणनाकर्मी डेटा गोळा करतील
3. Self Enumeration Portal → नागरिक स्वतः माहिती भरतील
4. Monitoring System → अधिकारी संपूर्ण प्रक्रिया पाहू शकतात
🌍 जनगणना का महत्त्वाची आहे ?
👉 जनगणना ही सरकारसाठी खूप महत्त्वाची असते कारण यावरच धोरणे ठरवली जातात.
उदाहरणार्थ-
• किती शाळा, रुग्णालये आवश्यक आहेत
• कोणत्या भागात विकासाची गरज आहे
👉 यावेळी जात (Caste) संबंधित माहितीही गोळा केली जाणार आहे, त्यामुळे सामाजिक धोरणांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरेल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• जनगणना 2027 → भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना
• शुभंकर → प्रगती (महिला) आणि विकास (पुरुष)
• उद्देश → जनजागृती + लोकसहभाग वाढवणे
• जनगणना प्रक्रिया → 2 टप्पे
• नवीन घटक → जात संबंधित माहिती समावेश
• लक्ष्य → विकसित भारत 2047
• जगातील सर्वात मोठी जनगणना प्रक्रिया
• पहिल्यांदाच स्व-गणनेचा पर्याय (Self Enumeration)
• भारतात प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने जनगणना


















