
चालू घडामोडी | लिंडसे ओ. ग्रॅहम सँक्शनिंग रशिया अँड इराण ॲक्ट, 2026
Lindsey O. Graham Sanctioning Russia & Iran Act, 2026
📚 Subject : GS - अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध (International Relations & Geopolitics)
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच अमेरिकेच्या सिनेटमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 'लिंडसे ओ. ग्रॅहम सँक्शनिंग रशिया अँड इराण ॲक्ट, 2026' नुसार रशियन ऊर्जा खरेदी करणाऱ्या प्रमुख देशांवर (भारतावर) कमाल किती टक्के आयात शुल्क (Tariff) लादण्याची तरतूद आहे ?
1. 25%
2. 50%
3. 75%
4. 100%
उत्तर : 100%
📰 बातमी काय ?
• अमेरिकेच्या सिनेटने (U.S. Senate) 'लिंडसे ओ. ग्रॅहम सँक्शनिंग रशिया अँड इराण ॲक्ट ऑफ 2026' या विधेयकाची प्रक्रिया जलद गतीने (Fast-track) पूर्ण करण्यासाठी मंजुरी दिली आहे.
• या विधेयकामुळे रशियन तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या जगातील अव्वल 5 खरेदीदार देशांवर अमेरिका 100% पर्यंत आयात शुल्क (Tariffs) लादू शकते.
🧐 विधेयकातील प्रमुख तरतुदी आणि तांत्रिक घटक
1) ऊर्जा खरेदीदारांवर 100% आयात शुल्क -
• रशियन कच्च्या तेलाचे किंवा नैसर्गिक वायूचे आयातदार असलेल्या अव्वल 5 देशांवर 100% पर्यंत आयात शुल्क लादण्याचे अधिकार या विधेयकाद्वारे अमेरिकन प्रशासनाला मिळतील.
• सध्या रशियन🇷🇺 तेलाचे सर्वात मोठे खरेदीदार देश म्हणजे चीन🇨🇳, भारत🇮🇳, स्लोव्हाकिया🇸🇰, हंगेरी🇭🇺 आणि अझरबैजान🇦🇿 हे आहेत.
2) 180 दिवसांची पुनरावलोकन अट -
• अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी (US Trade Representative - USTR) दर 180 दिवसांनी रशियन ऊर्जेच्या अव्वल 5 खरेदीदारांची यादी पुन्हा तपासतील आणि देशांच्या खरेदी वर्तनानुसार शुल्काचे दर बदलले जातील.
3) सवलतीचा अपवाद (Carve-out Exemption):
• जे देश रशियाकडून 15% पेक्षा कमी नैसर्गिक वायू आयात करतात आणि ती आयात टप्प्याटप्प्याने कमी करण्यासाठी ठोस पावले उचलत आहेत, त्यांना या 100% शुल्कामधून सवलत दिली जाईल.
🤔 अमेरिकेच्या या विधेयकाचे मुख्य उद्दिष्ट कोणते ?
• रशियाचा ऊर्जा क्षेत्रातील महसूल रोखून युक्रेन युद्धासाठी मिळणारा निधी रोखणे हा या विधेयकाचा मुख्य हेतू आहे.
📚 संदर्भ - अर्थशास्त्र संकल्पना
🤔 अमेरिकेच्या 100% आयात शुल्काचा (Tariff) अर्थ काय ?
✍️ उदाहरणार्थ - मानून चला की, भारतातील एक कंपनी 1,000 रूपयांचा एक शर्ट बनवून अमेरिकेत विकते.
• सध्याची परिस्थिती : अमेरिकेत हा शर्ट साधारणपणे 1,000 रूपयांला मिळतो, त्यामुळे अमेरिकन ग्राहक तो आवडीने खरेदी करतात.
• 100% आयात शुल्क लागू झाल्यावर : अमेरिकन सरकार या शर्टवर 100% कर (म्हणजेच आणखी ₹1,000) लादेल. यामुळे तोच शर्ट अमेरिकन ग्राहकाला आता ₹2,000 ला खरेदी करावा लागेल.
• भारतावर परिणाम : शर्ट दुप्पट महाग झाल्यामुळे अमेरिकन ग्राहक भारतीय शर्ट खरेदी करणे बंद करतील आणि इतर स्वस्त देशांचे पर्याय शोधतील.

📊 याचा भारतावर होणारा परिणाम (Impact on India) :
• 100% टॅरिफचा अर्थ - भारत ज्या वस्तू किंवा उत्पादने अमेरिकेला निर्यात करतो, त्यावर अमेरिकन सरकार दुप्पट कर लादेल, ज्यामुळे त्या वस्तू अमेरिकन बाजारात दुप्पट महाग होतील.
• निर्यातीला मोठा फटका - वस्तू महाग झाल्यामुळे अमेरिकेतील ग्राहक भारतीय वस्तू खरेदी करणे टाळतील, ज्याचा थेट फटका भारतातील कापडउद्योग, औषधनिर्मिती (फार्मा), आणि IT क्षेत्राला बसेल.
• भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम - अमेरिकेकडून मिळणारा निर्यात महसूल घटल्यामुळे भारतातील उत्पादन कंपन्यांचे आर्थिक नुकसान होईल आणि नवीन रोजगारनिर्मिती मंदावेल.
• परकीय चलनात घट - अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार असल्याने आयात शुल्कामुळे भारताच्या परकीय चलन साठ्यावर (Forex Reserve) आणि रुपयाच्या मूल्यावर दबाव येईल.
• कठीण धोरणात्मक पेच - रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी सुरू ठेवून ऊर्जा सुरक्षा जपणे की अमेरिकेतील अब्जावधी डॉलरची निर्यात वाचवणे, असा कठीण पेच भारतासमोर निर्माण होईल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : US Sanctions Act 2026
• विधेयकाचे नाव → Lindsey O. Graham Sanctioning Russia and Iran Act of 2026
• लक्ष्यित ऊर्जा खरेदीदार देश → अव्वल 5 देश (चीन🇨🇳, भारत🇮🇳, स्लोव्हाकिया🇸🇰, हंगेरी🇭🇺, अझरबैजान🇦🇿)
• टॅरिफचे स्वरूप → अमेरिकेत भारतीय वस्तूंच्या किमतीवर दुप्पट कर (100% Tariff)
• भारतावर होणारा परिणाम -
1) आर्थिक फटका → उत्पादन कंपन्यांचे आर्थिक नुकसान व रोजगारनिर्मितीचा वेग मंदावणे
2) सर्वाधिक प्रभावित क्षेत्रे → कापडउद्योग (Textiles), औषधनिर्मिती (Pharma) व IT क्षेत्र
3) परकीय चलनावर प्रभाव → निर्यात महसूल घटल्याने फॉरेक्स रिझर्व्ह (Forex Reserve) आणि रुपयाच्या मूल्यावर दबाव

