
चालू घडामोडी | राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन

National Energy Conservation Day
Subject : GS - पर्यावरण, दिनविशेष
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन केव्हा साजरी करण्यात येतो ?
1. 1 डिसेंबर
2. 14 डिसेंबर
3. 31 डिसेंबर
4. 1 जानेवारी
उत्तर : 14 डिसेंबर
बातमी काय आहे ?
• देशात 14 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो.
ऊर्जा संवर्धन म्हणजे काय ?
• उर्जेचा अनावश्यक वापर कमी करून, कमी उर्जेचा वापर करून उर्जेची बचत करणे हा ऊर्जा संवर्धनाचा खरा अर्थ आहे.
• भविष्यातील वापरासाठी उर्जेची बचत करण्यासाठी कार्यक्षमतेने वापरणे अत्यंत आवश्यक आहे.
• ऊर्जा संवर्धन नियोजनाच्या दिशेने अधिक परिणामकारक परिणाम मिळविण्यासाठी, प्रत्येक मानवी वर्तनाची गांभीर्याने काळजी घेऊन ऊर्जा वाचवता येते.
• उदाहरणार्थ : दैनंदिन वापरातील अनेक विद्युत उपकरणे जसे की पंखे, बल्ब गरज नसताना बंद करणे,
• कमी वीज खर्च करणारे उपकरणे वापरणे इत्यादी .
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन केव्हा पासून साजरी करण्यात येतो ?
• वर्ष 1991 पासून हा दिवस ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो (BEE) द्वारे हा दिवस साजरा करण्यात येतो.
• या दिवसाचे महत्त्व ओळखून 14 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार प्रदान केले जातात.
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे उद्दिष्ट कोणते ?
• भारतातील राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे उद्दिष्ट लोकांना उर्जेचे महत्त्व तसेच बचत आणि ऊर्जा बचतीद्वारे संवर्धनाची जाणीव करून देणे आहे.
• ऊर्जा संवर्धन, या विषयाला केंद्रस्थानी ठेवून कार्यक्षम पद्धती आणि तंत्रज्ञानाचा प्रचार करून अनावश्यक उर्जेचा वापर कमी करण्याच्या प्रयत्नांना चालना देणे, हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे.
ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो (Bureau of Energy Efficiency ) म्हणजे काय ?
ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• भारत सरकारने ऊर्जा संरक्षण कायदा, 2001 च्या तरतुदींनुसार 1 मार्च 2002 रोजी ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो (BEE) ची स्थापना केली.
• ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो भारत सरकारच्या अंतर्गत येते आणि ऊर्जा वापर कमी करण्यासाठी धोरणे आणि योजना विकसित करण्यात मदत करते.

