115 years of Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar’s poem Sagara Pran Talamalala
Subject : GS - इतिहास, पुस्तक आणि लेखक
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता कशाशी संबंधित आहे ?
1. 1857 च्या उठावातील सशस्त्र लढ्याचे वर्णन
2. हिंदुत्व ही सांस्कृतिक व नागरी ओळख असल्याची मांडणी
3. निर्वासित क्रांतिकारकाची मातृभूमीविषयीची तळमळ व वेदना
4. अंदमानातील कारागृह व्यवस्थेचे कायदेशीर विश्लेषण
उत्तर : निर्वासित क्रांतिकारकाची मातृभूमीविषयीची तळमळ व वेदना
बातमी काय ?
• केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनी श्री विजयपुरम येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरक यांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या कवितेच्या 115 व्या वर्षानिमित्त संबोधन केले.

‘सागरा प्राण तळमळला’ कविता कोणी लिहिली ?
• ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरक यांनी लिहिलेली आहे.
• ही एक मराठी देशभक्तिपर कविता आहे.
• परदेशात असलेल्या क्रांतिकारकाची मातृभूमीपासूनची ताटातूट, वेदना आणि ओढ या कवितेत व्यक्त होते.
• सागराला संदेशवाहक मानून, भारतात परत जाण्याची आर्त विनंती कवितेत दिसते.
• “ने मजसी ने परत मातृभूमीला” ही भावना या कवितेचा आत्मा आहे.
कविता लिहिण्यामागील पाऱ्श्वभूमी :
• ही कविता 1909 च्या सुमारास इंग्लंडमधील ब्राइटनच्या किनाऱ्यावर लिहिली गेली.
• त्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर लंडनला इंडिया हाउस (India House, London) येथे क्रांतिकारक चळवळीत सक्रिय होते.
• त्यांचे थोरले बंधू अटक झालेली, तसेच मदनलाल ढिंग्रा प्रकरणानंतर ब्रिटिश दबाव वाढलेला होता.
• परदेशात राहून लढा द्यायचा की भारतात परतायचे—या आत्मिक संघर्षाचे प्रतिबिंब या कवितेत उमटते.
• त्यामुळे ही कविता स्वातंत्र्यलढ्यातील निर्वासितांची सामूहिक वेदना दर्शवते.
‘सागरा प्राण तळमळला’ कवितेचे गायक आणि संगीतकार :
• गीतकार : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरक
• गायक : लता मंगेशकर, मीना मंगेशकर, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर.
• संगीतकार : पंडित हृदयनाथ मंगेशकर
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या साहित्यांपैकी काही प्रमुख साहित्य आणि संदर्भ :
हे हिन्दु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा -
• छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य व सांस्कृतिक रक्षणाचे प्रतीक म्हणून केलेले राष्ट्रवादी गौरवचित्रण.
• ही रचना इतिहासवर्णनापेक्षा राष्ट्रीय चेतना जागवणारी आणि लढाऊ प्रेरणा देणारी आहे.
सागरा प्राण तळमळला -
• निर्वासित क्रांतिकारकाची मातृभूमीविषयीची तळमळ व वेदना
1857 चे स्वातंत्र्यसमर (The Indian War of Independence, 1857) -
• 1857 च्या उठावाला राष्ट्रीय स्वातंत्र्ययुद्ध म्हणून मांडले.
हिंदुत्व : हिंदू कोण ? (Hindutva: Who Is a Hindu?) -
• हिंदुत्व ही सांस्कृतिक व नागरी ओळख असल्याची मांडणी.
माझी जन्मठेप (My Transportation for Life) -
• अंदमानातील सेल्युलर जेलमधील कारावासाचा आत्मकथनात्मक अनुभव.
भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने (Six Glorious Epochs of Indian History) -
• भारतीय इतिहासातील संघर्ष व पुनरुत्थानाची मांडणी.
सागरा प्राण तळमळला
ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मीं नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊं । सृष्टिची विविधता पाहूं
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्ठिं वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलों या तव वचनीं । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उद्धरणीं । मी
येईन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहुं या पुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मीं वेचियलीं या भावें । कीं तिनें सुगंधा घ्यावें
जरि उद्धरणीं व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आतां । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला
नभिं नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथें भव्य परि मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंचा
भुलविणें व्यर्थ हें आतां । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते ! जी सरिता । रे
त्वद्विरहाची शपथ घालितों तुजला । सागरा, प्राण तळमळला
या फेन-मिषें हंससि निर्दया कैसा । कां वचन भंगिसी ऐसा?
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीतें । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमि-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनीं एक क्षणिं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला