
चालू घडामोडी | जगातील सर्वात मोठा ग्रह संरक्षण सराव

The World's Largest Planetary Defence Drill
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडे युरोपने सुरू केलेला जगातील सर्वात मोठा ग्रह संरक्षण सराव (Planetary-Defence Drill) कोणत्या अंतराळीय वस्तूवर आधारित आहे ?
1. Apophis
2. 3I/ATLAS
3. Bennu
4. Itokawa
उत्तर : 3I/ATLAS
बातमी काय ?
• युरोपने 3I/ATLAS या वेगाने हालचाल करणाऱ्या अंतराळीय वस्तूवर आधारित जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा Planetary-Defence Drill सुरू केला आहे.
• या सरावामधून पृथ्वीवर उल्का किंवा धूमकेतू आदळण्याची शक्यता असल्यास जग किती तयार आहे, हे तपासले जात आहे.
ग्रह संरक्षण सराव (Planetary-Defence Drill) म्हणजे काय ?
• ग्रह संरक्षण सराव (Planetary-Defence Drill) म्हणजे पृथ्वीच्या जवळ येणाऱ्या उल्का किंवा धूमकेतूंमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याला कसे ओळखायचे, कसे मोजायचे आणि त्यावर कसा प्रतिसाद द्यायचा याचा केलेला जागतिक पातळीवरील सराव होय.
• हा सराव केवळ अभ्यासासाठी असून यामुळे कोणताही धोका नाही.
3I/ATLAS म्हणजे काय ?
• 3I/ATLAS ही अतिवेगाने हालचाल करणारी धूमकेतूसारखी अंतराळीय वस्तू आहे.
• ती सुमारे 60 किमी प्रति सेकंद वेगाने प्रवास करत आहे.
• खऱ्या वस्तूवर सराव केल्यामुळे वैज्ञानिकांना वास्तवातील अडचणी समजून घेणे सोपे होते.

ग्रह संरक्षण सराव कोणी सुरू केला ?
• Planetary-Defence Drill संयुक्तपणे ESA, NASA आणि UN-IAWN या संस्थांच्या यांच्या नेतृत्वाखाली घेतला जात आहे.
• ESA : European Space Agency
• NASA : National Aeronautics and Space Administration
• UN-IAWN : International Asteroid Warning Network
ग्रह संरक्षण सरावाचा मुख्य उद्देश काय ?
या सरावाचा मुख्य उद्देश म्हणजे -
• पृथ्वीला वेगाने येणाऱ्या अंतराळीय वस्तूंची वेळीच माहिती मिळते का ?
• उल्का पृथ्वीला धडकण्याचा धोका आहे की नाही हे मोजणे ?
• त्यांचा मार्ग अचूकपणे मोजता येतो का ?
• आणि धोका असल्यास जगभरातील संस्था एकत्र काम करू शकतात का ? - हे तपासणे होय.
यामध्ये नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याचाही सराव केला जातो.
ग्रह संरक्षण सराव प्रत्यक्षात कसा केला जातो ?
• सर्वप्रथम जमिनीवरील दूरबिणी आणि उपग्रहांच्या मदतीने 3I/ATLAS ची जागा, वेग आणि दिशा सतत पाहिली जाते.
• त्यानंतर गुरुत्वाकर्षण किंवा सूर्याच्या प्रभावामुळे त्याच्या मार्गात बदल होतो का, हे तपासले जाते.
• यानंतर हजारो संगणकीय प्रयोग करून पृथ्वीला धडकेची शक्यता आहे की नाही, हे मोजले जाते.
• शेवटी धोका असल्यास काय करायचे याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सराव केला जातो. जसे की, धोका वळवणे, लोकांना हलवणे, संरक्षण योजना इत्यादी.
ग्रह संरक्षण सरावाचे महत्त्व काय ?
• भविष्यात उल्का किंवा धूमकेतूंचा धोका ही केवळ वैज्ञानिक नव्हे तर जागतिक सुरक्षेची बाब आहे.
• पृथ्वी संरक्षणासाठी एकत्रित जागतिक व्यवस्था किती तयार आहे हे कळते.
• त्यामुळे भविष्यात अधिक मजबूत संरक्षण व्यवस्था उभारता येईल
















