
चालू घडामोडी | 2025 चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार कोणी जिंकला ?

UNEP Champions of the Earth Award – 2025
Subject : GS - पर्यावरण, पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरणीय सन्मान, 2025 चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार कोणी जिंकला ?
(RRB NTPC - 2024 चा पुरस्कार विचारला होता)
1. राजेंद्र सिंह
2. माधव गाडगीळ
3. सुप्रिया साहू
4. मेधा पाटकर
उत्तर : सुप्रिया साहू (Supriya Sahu)
(नोट : ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ श्री माधव गाडगीळ यांना 2024 मध्ये ‘चॅम्पियन ऑफ अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.)

बातमी काय ?
• 2025 साठी चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार भारताच्या सुप्रिया साहू यांना Inspiration & Action या वर्गात प्रदान करण्यात आला आहे.

चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कार काय आहे ?
• " चॅम्पियन्स ऑफ द अर्थ " हा संयुक्त राष्ट्राचा पर्यावरणासाठीचा सर्वोच्च पुरस्कार आहे.
• हा पुरस्कार United Nations Environment Programme (UNEP) कडून दिला जातो.
• " चॅम्पियन्स ऑफ द अर्थ " पुरस्कार पहिल्यांदा 2005 मध्ये देण्यात आला.
" चॅम्पियन्स ऑफ द अर्थ " पुरस्कार कोणाला देण्यात येतो ?
• जगभरातील पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या, निसर्ग आणि जैवविविधतेचे नुकसान, प्रदूषण आणि कचरा तसेच हवामान बदलाच्या संकटाला शाश्वत मार्गाने तोंड देता येईल, यासंदर्भात उपाय सुचवणाऱ्या संशोधकांना, शास्त्रज्ञांना, कार्यकर्त्यांना आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो.
सुप्रिया साहू यांना " चॅम्पियन्स ऑफ द अर्थ " पुरस्कार का देण्यात आला ?
• सुप्रिया साहू यांना हा पुरस्कार तामिळनाडू राज्यात हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रभावी आणि प्रत्यक्ष कृतीमुळे देण्यात आला.
• यात उष्णतेशी जुळवून घेण्यासाठी राबवलेल्या उपाययोजना, निसर्गाधारित समाधान, परिसंस्था पुनर्संचयितीकरण आणि शाश्वत थंडकरण धोरणांचा समावेश आहे.
उष्णतेशी जुळवून घेण्यासाठी उपाययोजना :
• त्यांनी उष्णतेशी जुळवून घेण्यासाठी (Heat Adaptation) उपाययोजना राबवत वाढत्या तापमानाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली.
• यामध्ये निसर्गाधारित उपाय (Nature-based Solutions) वापरून झाडे, जलस्रोत आणि नैसर्गिक परिसंस्थांचा प्रभावी उपयोग करण्यात आला.
परिसंस्था पुनर्संचयित :
• त्यांच्या नेतृत्वाखाली परिसंस्था पुनर्संचयित करणे (Ecosystem Restoration) या माध्यमातून वनसंरक्षण व जैवविविधतेत वाढ करण्यात आली, ज्यामुळे पर्यावरणीय संतुलन सुधारले.
शाश्वत थंडकरण :
• तसेच त्यांनी Sustainable Cooling (शाश्वत थंडकरण) धोरणे राबवून कमी ऊर्जा वापरणाऱ्या व पर्यावरणपूरक उपायांना चालना दिली.
या सर्व उपक्रमांमुळे -
• 25 लाख (2.5 Million) हरित रोजगार निर्माण झाले,
• वनक्षेत्रात लक्षणीय वाढ झाली,
• आणि 1.2 कोटी (12 Million) लोकांना थेट लाभ झाला.
महत्त्व :
• या यशस्वी उपक्रमांमुळे तामिळनाडू राज्य जागतिक पातळीवर हवामान कृतीचे आदर्श मॉडेल ठरले.
• म्हणूनच सुप्रिया साहू यांच्या प्रेरणादायी नेतृत्वासाठी आणि प्रत्यक्ष कृतीसाठी त्यांना UNEP Champions of the Earth Award – 2025 (Inspiration & Action) या वर्गात सन्मानित करण्यात आले.















