
चालू घडामोडी | मानवी हक्क दिन

Human Rights Day
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मानवी हक्क दिन (Human Rights Day) दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1. 2 डिसेंबर
2. 10 डिसेंबर
3. 14 डिसेंबर
4. 21 डिसेंबर
उत्तर : 10 डिसेंबर
बातमी काय ?
• दरवर्षी मानवी हक्क दिन (Human Rights Day) 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
• हा दिवस 1948 मध्ये सार्वत्रिक मानवी हक्क जाहीरनामा स्वीकारल्याच्या स्मरणार्थ पाळला जातो.
मानवी हक्क दिन 10 डिसेंबरला च का साजरा केला जातो ?
• 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने मानवी हक्क जाहीरनामा (Universal Declaration of Human Rights – UDHR) स्वीकारला.
• या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा, समानतेचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
• जगभरातील देशांनी मानवी हक्कांचे संरक्षण करण्याची आपली बांधिलकी अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

मानवी हक्क दिनाची अधिकृत स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
• मानवी हक्क दिनाची अधिकृत स्थापना 1950 मध्ये करण्यात आली.
• ही स्थापना संयुक्त राष्ट्र महासभेच्या (United Nations General Assembly - UNGA) ठरावाद्वारे झाली.
• या ठरावामध्ये सर्व देशांना दरवर्षी 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.

मानवी हक्क दिन 2025 ची संकल्पना (थीम) कोणती ?
• “मानवी हक्क, आपल्या दैनंदिन जीवनातील आवश्यक गोष्टी” (Human Rights, Our Everyday Essentials) ही 2025 ची संकल्पना आहे.
• यामध्ये अन्न, पाणी, आरोग्यसेवा, शिक्षण, निवारा आणि स्वच्छता यांसारख्या दैनंदिन मूलभूत गरजा ह्या देखील मानवी हक्क आहेत, हा संदेश देण्यात आला आहे.
• फक्त कायदेशीर हक्कच नव्हे, तर सामान्य जीवनासाठी आवश्यक असलेल्या सुविधा मिळणेदेखील मानवी हक्कांचा भाग आहे, यावर या संकल्पनेत भर देण्यात आला आहे.

भारत आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी तरतूदी :
• भारतामध्ये मानवी हक्कांचे संरक्षण भारताच्या संविधानाद्वारे (Constitution of India) केले जाते.
• याशिवाय मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मानवी हक्क संरक्षण कायदा, 1993 (Protection of Human Rights Act, 1993) हा स्वतंत्र कायदा अस्तित्वात आहे.
• या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (National Human Rights Commission - NHRC) ची स्थापना 1993 मध्ये करण्यात आली.
मानवी हक्क संरक्षण कायदा, 1993 नुसार मानवी हक्क म्हणजे काय ?
What are the Human Rights under the Human Rights Act, 1993 ?
• या कायद्यानुसार, मानवी हक्क म्हणजे व्यक्तीचे -
• जीवन, स्वातंत्र्य, समानता आणि सन्मानाशी संबंधित हक्क,
• जे भारतीय संविधानाने हमी दिलेले आहेत किंवा आंतरराष्ट्रीय करारांमध्ये समाविष्ट आहेत
• आणि जे भारतातील न्यायालयांमार्फत अंमलात आणता येतात.
• हे अधिकार प्रत्येक व्यक्तीला जन्मापासून मिळतात आणि त्यांना सन्मानाने व स्वातंत्र्याने जगण्यासाठी आवश्यक आहेत.













