
चालू घडामोडी | चक्रवर्ति राजगोपालाचारी
C. Rajagopalachari
Subject : GS - आधुनिक भारताचा इतिहास, दिनविशेष, व्यक्ती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर-जनरल कोण ?
(तलाठी भरती, महाराष्ट्र पोलिस भरती, सरळसेवा भरती, SSC MTS 2023....)
1. डॉ. राजेंद्र प्रसाद
2. पंडित जवाहरलाल नेहरू
3. लॉर्ड माउंटबॅटन
4. सी. राजगोपालाचारी
उत्तर : सी. राजगोपालाचारी
चक्रवर्ति राजगोपालाचारी यांचा जन्म केव्हा आणि कोठे झाला ?
• जन्म : चक्रवर्ति राजगोपालाचारी यांचा जन्म 10 डिसेंबर 1878 रोजी तामिळनाडू राज्यातील सालेम जिल्ह्यातील थोरापल्ली येथे झाला.
• पुढे ते “राजाजी” या नावाने संपूर्ण देशात ओळखले जाऊ लागले.
प्रारंभिक जीवन, शिक्षण व व्यावसायिक वाटचाल :
• राजगोपालाचारी यांनी होसूर, बेंगळुरू आणि प्रेसिडेन्सी कॉलेज, मद्रास येथे शिक्षण घेतले.
• शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सालेम येथे फौजदारी वकील म्हणून यशस्वी कारकीर्द सुरू केली.
• मात्र देशातील राजकीय परिस्थिती पाहता त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला.
• 1917 साली ते सालेम नगरपालिकेचे अध्यक्ष झाले आणि येथूनच त्यांच्या सार्वजनिक व राजकीय कारकिर्दीला खरी सुरुवात झाली.
स्वातंत्र्य चळवळीतले योगदान :
रौलेट सत्याग्रह (1919): 1919 मधील रॉलेट सत्याग्रहात त्यांनी मद्रास प्रांतात नेतृत्व केले.
• मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने केली; मरीना बीचवर मोठ्या सभांना संबोधित केले.
असहकार चळवळ : आपली आपली चालू वकिली ची नोकरी सोडून ब्रिटीश राजवटीविरुद्ध तमिळनाडूला संघटित केले.
खिलाफत चळवळ : खिलाफत समित्या आणि प्रांतीय आंदोलनांना सक्रियपणे पाठिंबा दिला.
तामिळनाडूमध्ये झालेल्या वेदारण्यम मिठाच्या सत्याग्रह आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले ?
• सी राजगोपालाचारी यांनी तामिळनाडूमध्ये मिठाच्या सत्याग्रह आंदोलनाचे नेतृत्व केले.
• महात्मा गांधींच्या दांडी यात्रेपासून प्रेरित होऊन, सी राजगोपालाचारी यांनी एप्रिल 1930 मध्ये तामिळनाडूमध्ये वेदारण्यम मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
• सी राजगोपालाचारी यांनी 13 एप्रिल रोजी तिरुचिरापल्ली (Trichirappalli) येथून आपला मोर्चा सुरू केला आणि 28 एप्रिल रोजी वेदारण्यम (Vedaranyam) येथे पोहोचले.
• ज्याचा उद्देश ब्रिटिश मिठावरील कराचा निषेध करणे आणि खादी व सामाजिक विषमतेबद्दल जागरूकता पसरवणे हा होता.
• यातून 'दांडी यात्रे'च्या मिठाच्या सत्याग्रहाला दक्षिण भारतातही बळ मिळाले.
सी. राजगोपालाचारी यांचे 'माझ्या विवेकाचे रक्षक' असे कोणी वर्णन केले ?
Who described C. Rajagopalachari as 'the keeper of my conscience'?
• महात्मा गांधीजींनी सी. राजगोपालाचारी यांना “माझ्या अंतःकरणाचा रक्षक” ('The Keeper of my Conscience') असे संबोधले होते.
• सी. राजगोपालाचारी हे महात्मा गांधींच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक होते.
• महात्मा गांधींनी पुरस्कारलेल्या खादीचा प्रसार, जातीय ऐक्य, राष्ट्रीय शिक्षण आणि अस्पृश्यतानिवारण या चतुःसूत्रीचा त्यांनी आयुष्यभर प्रसार-प्रचार केला.
सी. राजगोपालाचारी यांनी भूषविलेली स्वातंत्र्यानंतरची महत्त्वाची पदे :
• 1947–48 : पश्चिम बंगालचे राज्यपाल
• 1948–50 : भारताचे गव्हर्नर-जनरल (भारताचे शेवटचे गव्हर्नर-जनरल)
• 1950 : केंद्रीय गृहमंत्री (सरदार वल्लभभाई पटेलांनंतर)
• 1952–54 : मद्रास राज्याचे मुख्यमंत्री
सी. राजगोपालाचारी महत्त्वाची ओळख (Short Notes) :
• भारताचे एकमेव भारतीय व शेवटचे गव्हर्नर-जनरल
• वेदारण्याम मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व
• स्वतंत्र पक्षाचे संस्थापक (Founder of the Swatantra Party)
• साधेपणा, प्रामाणिकपणा व तर्कशुद्ध विचारांसाठी प्रसिद्ध



















