
चालू घडामोडी | ऑपरेशन सागर बंधु

Operation Sagar Bandhu
Subject : GS
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सागर बंधु’ मोहीम हाती घेतली. ही मोहीम खालील पैकी कशाशी संबंधित आहे ?
1. युद्ध सराव
2. नक्षलवाद विरोधी मोहीम
3. सायबर गुन्ह्यांविरोधी मोहीम
4. मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण मोहीम
उत्तर : मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण मोहीम
बातमी काय ?
• चक्रीवादळ दितवाह( Ditwah ) मुळे श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावर नुकसान व जीवितहानी झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सागर बंधु अंतर्गत तातडीचे मानवी मदत व आपत्ती निवारण अभियान (Humanitarian Assistance and Disaster Relief operations) सुरू केले आहे.
• श्रीलंकेच्या पुनर्वसन प्रयत्नांत, सार्वजनिक सेवा पूर्वपदावर आणण्यात आणि प्रभावित भागांमध्ये रोजगार सुरु करण्यात भारत सर्व आवश्यक मदत देईल असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना दिला.

ऑपरेशन सागर बंधु बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• श्रीलंकेत झालेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर मदत करण्यासाठी भारताने सुरू केलेले त्वरित मानवी मदत व आपत्ती निवारण (HADR) अभियान आहे.
• या ऑपरेशनमध्ये भारतीय नौदल, भारतीय हवाई दल आणि NDRF यांचा संयुक्त सहभाग आहे.
• ही मानवतावादी मदत भारताच्या ‘शेजारी प्रथम' (‘Neighbourhood First’ Policy) या धोरणाच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे.
• भारताच्या Neighbourhood First Policy आणि Vision MAHASAGAR या धोरणांनुसार हे अभियान राबवले जात आहे.
NDRF ची भूमिका (Rescue Support) :
• NDRF चे 2 विशेष पथक श्रीलंकेत पाठविण्यात आले.
• 80 प्रशिक्षित बचाव कर्मचारी, 4 शोधक श्वान (Canines) श्रीलंकेत पाठविण्यात आले.
• फुगवता येणाऱ्या नौका, हायड्रॉलिक कटर, ब्रिचिंग टूल्स, दळणवळण साधने, वैद्यकीय किट्स इत्यादी साहित्य श्रीलंकेत मदत कार्यासाठी पोहोचविण्यात आले.
भारतीय हवाई दलाची मदत (Air Assistance) :
• C-130J विमानाद्वारे 12 टन साहित्य श्रीलंकेत पोहोचवले.
• यामध्ये, तंबू, ताडपत्री, ब्लँकेट्स, स्वच्छता किट्स, रेडी-टू-ईट अन्नपदार्थ इत्यादी. वस्तू होत्या.
भारतीय नौदलाची भूमिका (Naval Support) :
• INS Vikrant आणि INS Udaygiri या नौकांनी मदत साहित्य पोहोचवले.
• 4.5 टन कोरडे रेशन, 2 टन ताजे अन्नधान्य इतर अत्यावश्यक वस्तू नौदलामार्फत वितरित करण्यात आल्या.
• या दोन्ही नौका सुरुवातीला कोलंबो येथे आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यूसाठी होत्या, पण आपत्ती लक्षात घेऊन मदत कार्यासाठी तातडीने पुनर्नियुक्त करण्यात आल्या.
ऑपरेशन सागर बंधुचे महत्त्व :
• ऑपरेशन सागर बंधु अंतर्गत श्रीलंकेच्या किनारी व दाट लोकवस्ती असलेल्या भागात शोध-बचाव क्षमतांमध्ये मोठी वाढ.
• भारत–श्रीलंका संबंधांतील मानवी सहकार्याचे ठोस उदाहरण.
• भारताची प्रादेशिक जबाबदारी आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून भूमिका अधोरेखित.
मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण म्हणजे नेमकं काय ?
What exactly is Humanitarian Assistance and Disaster Relief ?
• मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण हे एक लष्करी सहकार्य आहे ज्याचे उद्दिष्ट आपत्तीच्या वेळी जलदगतीने मदत कार्य करणे. हे आहे.
• आपत्तीच्या वेळी लोकांचे प्राण वाचवणे आणि नैसर्गिक आपत्तींच्या वेळी आपत्कालीन परिस्थितीचे निराकरण करणे.
उदाहरणार्थ : पूर, भूस्खलन, चक्रीवादळ यांसारख्या आपत्तींच्या वेळी भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) तसेच अन्य एजन्सी हे मदतीसाठी धावून येतात.
















