
चालू घडामोडी | भारतीय नौदल दिन 2025

Indian Navy Day 2025
Subject : GS - दिनविशेष, संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी भारतीय नौदल दिन केव्हा साजरी केला जातो ?
1. 10 मार्च
2. 8 ऑक्टोबर
3. 21 ऑक्टोबर
4. 4 डिसेंबर
उत्तर : 4 डिसेंबर
• केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) स्थापना दिन : 10 मार्च
• भारतीय वायुसेना दिन : 8 ऑक्टोबर
• पोलीस स्मृती दिन : 21 ऑक्टोबर
• भारतीय नौदल दिन : 4 डिसेंबर
बातमी काय ?
• भारतीय नौदलाच्या उल्लेखनीय योगदानाचे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी दरवर्षी 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा केला जातो.
ऑपरेशन ट्रायडेंट काय आहे ?
What is Operation Trident ?
भारतीय नौदल दिन 4 डिसेंबर लाच का साजरी करतात ?
• 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर केलेला हा प्रतिहल्ला होता.
• 4 डिसेंबर 1971 मध्ये केलेल्या या कारवाईदरम्यान भारताने प्रथमच जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचा वापर केला आणि PNS खैबरसह चार पाकिस्तानी जहाजे बुडवली.
• ऑपरेशन ट्रायडेंट दरम्यान भारतीय नौदलाने भारताचे तांत्रिक वर्चस्व आणि प्रगती जगाला दाखवून दिली.
• भारतीय नौदलाच्या या शौर्याचे प्रतीक म्हणून 4 डिसेंबर हा दिन भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.
भारतीय नौदलाचे जनक म्हणून कोणास म्हटले जाते ?
• सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारले.
• त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक (Father of the Indian Navy) म्हटले जाते.
भारतीय नौदलाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• भारतीय नौदलाची स्थापना 1612 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी द्वारे केली गेली नंतर त्याला रॉयल इंडियन नेव्ही असे नाव देण्यात आले.
• स्वातंत्र्यानंतर 1950 मध्ये भारतीय नौदल म्हणून त्याची पुनर्रचना करण्यात आली.
भारतीय नौदलाचे सर्वोच्च कमांडर कोण असतात ?
• भारताचे राष्ट्रपती सर्वोच्च कमांडर म्हणून नौदलाचे नेतृत्व करतात.
• भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू या सध्याचे (वर्तमान) भारतीय नौदलाचे सर्वोच्च कमांडर आहेत.
भारतीय नौदलाचे सध्याचे नौदल प्रमुख कोण आहेत ?
• ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे भारतीय नौदलाचे सध्याचे नौदल प्रमुख आहेत.
• 30 एप्रिल 2024 पासून त्यांनी भारतीय नौदलाचे नौदल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला.

भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण केव्हा करण्यात आले ?
• 2 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण केले.
• भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजावर भारतीय नौदलाचे नवीन बोधचिन्ह आहे.
• छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारापासून प्रेरित होऊन भारतीय नौदलाचे नवीन बोधचिन्ह तयार करण्यात आले.

भारतीय नौदलाचे ब्रीदवाक्य काय आहे ? (Indian Navy Motto)
• " शं नो वरूण: " हे भारतीय नौदलाचे ब्रीदवाक्य आहे.
• पावसाची देवता म्हणजे च वरूण देवता आमचं रक्षण करो असा त्याचा अर्थ होतो.
भारतीय नौदल दिन 2025 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
"लढाईसाठी सज्ज, एकसंध आणि आत्मनिर्भर" ही यंदाच्या नौदल दिनाची संकल्पना आहे.
(Combat Ready, Cohesive, Credible, and Aatmanirbhar Force)


















