
चालू घडामोडी | दितवाह चक्रीवादळ

Cyclone "Ditwah"
Subject : GS - भूगोल - हवामान : चक्रीवादळ
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत तडाखा देणाऱ्या “दितवाह” चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने सुचवले आहे ?
1. श्रीलंका
2. येमेन
3. इंडोनेशिया
4. भारत
उत्तर : येमेन (Yemen)
बातमी काय ? 📰
• बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत सक्रिय असलेल्या चक्रीवादळ ‘दितवाह’ 🌪️ मुळे श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, हे वादळ आता तामिळनाडू व आंध्र प्रदेशाकडे सरकत आहे.
⚠️ चक्रीवादळ ‘दितवाह’ चे श्रीलंकेतील परिणाम (Impact in Sri Lanka) :
• चक्रीवादळ ‘दितवाह’ मुळे श्रीलंकेत पूर 🌊, दरडी कोसळणे ⛰️, वादळाशी संबंधित अपघात 🚑 या घटनांमुळे किमान 56 जणांचा मृत्यू झाला आहे.
• धोकादायक भागांतील नागरिकांचे स्थलांतर करून आपत्कालीन उपाययोजना 🚨 राबवण्यात येत आहेत.
📍चक्रीवादळ दितवाह कोठे तयार झाले ?
• चक्रीवादळ दितवाह (Ditwah) ची निर्मिती श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळील गंभीर कमी दाबाच्या (Deep Depression) क्षेत्रातून 🌧️ झाली.
• भारतीय हवामान विभागाने (IMD) ☁️ याला चक्रीवादळ (Cyclonic Storm) म्हणून वर्गीकृत केले आहे.
• सध्या तरी हे वादळ तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता कमी ⚖️ असल्याचे सांगण्यात आले आहे.
चक्रीवादळ दितवाह तयार होण्यासाठी लागणारे भौगोलिक व हवामान परिस्थिती 🌍 :
• ‘चक्रीवादळ दितवाह’ ची निर्मिती ईशान्य मान्सूनच्या काळात 🌬️ झाली आहे.
• बंगालच्या उपसागरातील उबदार समुद्राच्या पृष्ठभागावर तापमानामुळे चक्रीवादळाला बळ मिळाले.
• तसेच चक्रीवादळ ‘सेनयार’ (Senyar) च्या अवशेषांमुळे वातावरणात अधिक आर्द्रता व अस्थिरता निर्माण झाली.
🏷️ चक्रीवादळाला “दितवाह” हे नाव कोणी दिले ?
Who gave the name Ditwah to cyclone ?
• चक्रीवादळाला ‘दितवाह’ हे नाव येमेन (Yemen) 🇾🇪 देशाने दिले आहे.
• हे नाव येमेनच्या सोकोत्रा बेटावरील ‘दितवाह’ खारफुटी तलाव (Detwah Lagoon) 🏝️ वरून ठेवण्यात आले आहे.
🌪️ चक्रीवादळ म्हणजे काय ? आणि ते कसे तयार होतात ?
What is a Cyclone and How is it formed? ?
• काही स्थानिक कारणांमुळे एकाएकी हवेच्या दाबात बदल होऊन मध्यभागी कमी दाबाचे केंद्र निर्माण होते आणि त्याच्या सभोवती हवेचा जास्त दाब होत जातो. यामुळे वारे चक्राकार गतीने कमी दाबाच्या केंद्राकडे वेगाने आकर्षिली जातात, त्याच आवर्त किंवा चक्रीवादळ असे म्हणतात.
• चक्रीवादळे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ⏪ (Anti-clockwise) फिरतात
• आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या दिशेने ⏩ (Clockwise) फिरतात.

🌐 चक्रीवादळांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते :
• हिंदी महासागरातील वादळाला चक्रीवादळ (Cyclone) 🌊 म्हटले जाते.
• वेस्ट इंडिज आणि अटलांटिकमधील वादळाला हरिकेन (Hurricane) 🌪️ नावाने ओळखले जाते.
• पॅसिफिक महासागर व चिनी समुद्रातील वादळाला टायफून (Typhoon) 🌬️ या नावाने ओळखले जाते.
• ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावरील वादळाला विली-विली (Willy-Willy) 🇦🇺 या नावाने ओळखले जाते.
📝 (नोट : वरील ठिकाणे आणि चक्रीवादळांना तेथे काय म्हणतात हे लक्षात ठेवा पेपर ला बरोबर जोडी कोणती असे प्रश्न विचारले जातात.)

















