
चालू घडामोडी | डॉ. राजेंद्र प्रसाद

Dr. Rajendra Prasad
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन 🙏💐💐
Subject : GS - राज्यशास्त्र, आधुनिक भारताचा इतिहास, दिनविशेष, व्यक्ती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न ) संविधान सभेच्या सुकाणू समिती चे अध्यक्ष खालील पैकी कोण होते ?
1. डॉ. राजेंद्र प्रसाद
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3. सरदार वल्लभभाई पटेल
4. पंडित जवाहरलाल नेहरू
उत्तर : डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
जन्म आणि शिक्षण :
• त्यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 रोजी बिहारच्या सारन जिल्ह्यातील जीरादेई या खेड्यात झाला.
• ते 1902 मध्ये कलकत्ता प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये दाखल झाले.
• 1907 मध्ये कलकत्ता विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर, त्यांनी कलकत्ता लॉ कॉलेजमध्ये कायद्याचा अभ्यास केला आणि कलकत्ता उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली.
• त्यांनी 1937 मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून कायद्यात डॉक्टरेट पूर्ण केली.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान :
1911 मध्ये, ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य झाले.
चंपारण सत्याग्रह (1917) :
• बिहारच्या 1917 च्या चंपारण्य सत्याग्रहाच्या वेळी महात्मा गांधींशीं त्यांचा परिचय वाढला.
• डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील चंपारण सत्याग्रहाला सक्रिय पाठिंबा दिला.
• असहकार चळवळीचा भाग म्हणून त्यांनी बिहारमध्ये असहकार पुकारला आणि राज्याचा दौरा केला, जाहीर सभा आयोजित केल्या आणि समर्थन मिळविण्यासाठी भाषणे दिली.
• रौलट कायदा रद्द व्हावा, म्हणून देशात १९१९ मध्ये सत्याग्रहाची चळवळ सुरू झाली. त्यावेळी डॉ. राजेंद्र प्रसाद बिहार प्रांतिक परिषदेच्या अध्यक्षपदी निवडून आले.
• 1921 मध्ये पाटण्यात त्यांनी राष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना करून स्वदेशी, मद्यपानबंदी, खादीचा प्रसार इ. कार्यक्रम हाती घेतले.
• 1931 मध्ये मिठाचा सत्याग्रह आणि 1942 च्या भारत छोडो आंदोलनात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष :
• डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी ऑक्टोबर 1934 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले.
• 1939 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षपदी निवड झाली.
• 1947 मध्ये जे. बी. कृपलानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर डॉ. राजेंद्र प्रसाद हे तिसऱ्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा संविधान निर्मितीत सहभाग :
• 1946 मध्ये, राजेंद्र प्रसाद भारताच्या हंगामी सरकारमध्ये अन्न आणि कृषी मंत्री म्हणून पदभार सांभाळला.
• 1946 ते 1950 या काळात संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.
डॉ. राजेंद्र प्रसाद संविधान सभेच्या कोण कोणत्या समितींचे अध्यक्ष होते ?
सुकाणू समिती, कार्यपद्धती नियम समिती, वित्त आणि कर्मचारी समिती या संविधान सभेच्या समितींचे डॉ. राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते.
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत ?
• डॉ. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत.
• डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 26 जानेवारी 1950 ते 13 मे 1962 पर्यंत भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून काम केले.
• डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 12 वर्षे भारताचे राष्ट्रपती होती.
• भारत सरकारने 1962 मध्ये भारतरत्न हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार देऊन त्यांच्या देशसेवेचा बहुमान केला.
• निवृत्तीनंतर ते बिहारमधील आपल्या सदाकत आश्रमात राहण्यास गेले.
• डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे 28 फेब्रुवारी 1963 रोजी निधन झाले.
डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी लिहिलेली काही पुस्तके :
• "चंपारण येथील सत्याग्रह", (Satyagraha at Champaran)
• " इंडिया डिवायडेड" (India Divided)
• " आत्मकथा” (Atmakatha)
• “महात्मा गांधी आणि बिहार, काही आठवणी” (Mahatma Gandhi and Bihar, Some Reminiscences)
• “बापू के कदमों में” (Bapu ke Kadmon Mein)



















