
चालू घडामोडी | 61वा सीमा सुरक्षा दल स्थापना दिन

61st Raising Day of BSF
Subject : GS - दिनविशेष, संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी सीमा सुरक्षा दल (BSF) स्थापना दिन केव्हा साजरी केला जातो ?
(SSC GD)
1) 10 मार्च
2) 8 ऑक्टोबर
3) 21 ऑक्टोबर
4) 1 डिसेंबर
उत्तर) 1 डिसेंबर
• केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) स्थापना दिन : 10 मार्च
• भारतीय वायुसेना दिन : 8 ऑक्टोबर
• पोलीस स्मृती दिन : 21 ऑक्टोबर
• सीमा सुरक्षा दल (BSF) स्थापना दिन : 1 डिसेंबर
सीमा सुरक्षा दल (BSF) बद्दल IMP वनलाईनर पॉईंट्स :
BSF : Border Security Force
सीमा सुरक्षा दलाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• 1965 पर्यंत भारताच्या पाकिस्तानच्या सीमेवर राज्य सशस्त्र पोलीस बटालियनचे व्यवस्थापन होते.
• 9 एप्रिल 1965 रोजी पाकिस्तानने कच्छमधील सरदार पोस्ट, छर बेट आणि बेरिया बेटावर हल्ला केला.
• या घटनेमुळे सशस्त्र आक्रमणाचा सामना करण्यासाठी भारत सरकारला एका विशेष केंद्र नियंत्रित सीमा सुरक्षा दलाची गरज भासली, जी पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर सशस्त्र आणि प्रशिक्षित असेल.
• समितीच्या शिफारशीनुसार 1 डिसेंबर 1965 रोजी सीमा सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली.
• BSF हे गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करते.
सीमा सुरक्षा दलाचे पहिले महासंचालक कोण आहेत ?
• श्री के. एफ. रुस्तमजी (Shri K F Rustamji), हे BSF चे पहिले महासंचालक होते.
• BSF च्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
• यामुळे त्यांना BSF चे Founding Father म्हणून ही ओळखले जाते.

सीमा सुरक्षा दलाचे सध्याचे महासंचालक कोण आहेत ?
• श्री. दलजीत सिंह चौधरी (Shri Daljit Singh Chawdhary , IPS) सर BSF चे वर्तमान महासंचालक (DIRECTOR GENERAL) आहेत.
सीमा सुरक्षा दलाचे बोधवाक्य (Motto) काय आहे ?
• जीवन पर्यंत कर्तव्य (Duty Until Death) हे सीमा सुरक्षा दलाचे बोधवाक्य आहे .
BSF चे विशेष युनिट्स कोणते ?
• हवाई शाखा
• नौदल शाखा
• तोफखाना रेजिमेंट
• क्रीक क्रोकोडाइल कमांडो फोर्स
• थार वाळवंटातील विशेष ऑपरेशन्ससाठी उंटांची तुकडी (camel cavalry)
BSF कोठे तैनात आहेत ?
अंदाजे 2.6 लाख जवानांचा समावेश असलेले BSF,
• भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा,
• भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमा,
• नियंत्रण रेषेवर (LoC)
• काश्मीर खोऱ्यात घुसखोरीविरोधी भूमिका
• ईशान्य प्रदेशातील बंडखोरी
• ओडिशा आणि छत्तीसगड राज्यांमध्ये नक्षलविरोधी ऑपरेशन क्षेत्रांमध्ये तैनात आहे.
• तसेच BSF पाकिस्तान आणि बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवरील एकात्मिक चेक पोस्टची सुरक्षा देखील करत आहे.
BSF चे काही महत्वाचे योगदान :
• 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात BSF देश संरक्षणा बरोबर अडकलेल्या बांग्लादेशी नागरिकांना मदत करून माणूसकीचे दर्शन घडविले.
• 1999 च्या कारगिल युद्धादरम्यान, BSF पर्वतांच्या उंचीवर राहिले आणि सैन्याबरोबर एकजुटीने सर्व सामर्थ्याने देशाच्या अखंडतेचे रक्षण केले.
• BSF चे जवान गेल्या 10 वर्षांपासून मणिपूरमध्ये अंतर्गत सुरक्षा कर्तव्य बजावत आहेत आणि त्या भागात बंडखोरीचा यशस्वीपणे सामना करत आहेत.
• 26 जानेवारी 2001 रोजी गुजरातमध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी, BSF ने संकटग्रस्त लोकांना मदत केली.
• BSF प्रसिद्ध करतारपूर कॉरिडॉरवरील सुरक्षेची जबाबदारी हाताळत आहे.
• BSF ने कोविड महामारी दरम्यान सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना आवश्यक मदत प्रदान केली.













