
चालू घडामोडी | ताडोबा-अंधारी प्रकल्पात 800 एकर रिवाइल्डिंग उपक्रम

ताडोबा-अंधारी प्रकल्पात 800 एकर रिवाइल्डिंग उपक्रम
800 Acres of Reforestation Initiative in Tadoba-Andhari Project
Subject : GS - पर्यावरण, सरकारी योजना- उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 800 एकरच्या रिवाइल्डिंग प्रकल्पासाठी कोणती खाजगी कंपनी सहकार्य करत आहे ?
1. टाटा
2. झिरोधा
3. रिलायन्स
4. इन्फोसिस
उत्तर : झिरोधा (Zerodha)
बातमी काय ?
• ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील 800 एकर क्षेत्रात पर्यावरणीय पुनरुज्जीवन (Rewilding) करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम महाराष्ट्र सरकारने सुरू केला.
ताडोबा-अंधारी रिवाइल्डिंग प्रकल्पा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• ताडोबा-अंधारी रिवाइल्डिंग प्रकल्प हा महाराष्ट्रातील पहिला अधिकृत रिवाइल्डिंग प्रकल्प असून, यासाठी झिरोधा कंपनी आणि रेन मॅटर फाउंडेशन 100कोटींच्या निधीतून सहकार्य करणार आहेत.
• यातून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील 800 एकर क्षेत्रात पर्यावरणीय पुनरुज्जीवन करण्यात येईल.

ताडोबा-अंधारी रिवाइल्डिंग प्रकल्पाचा उद्देश काय ?
• मोनोकल्चर वृक्षलागवड थांबवून नैसर्गिक जैवविविधता पुनर्संचयित करणे.
• निसर्गातील पर्यावरणीय समतोल परत आणणे.
🌳 रिवाइल्डिंग म्हणजे काय ?
• रिवाईल्डिंग म्हणजे जंगल, गवताळ प्रदेश किंवा जलक्षेत्रात मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून तेथील नैसर्गिक भूभाग, वन्यजीव आणि जैवविविधतेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन करणे होय.
• नैसर्गिक भूभाग, जैवविविधता आणि वन्यजीवांचे संरक्षण व वाढ हे याचे मुख्य उद्दिष्ट असते.
💰 झिरोधाचा ‘रिवाइल्डिंग फंड’ :
• झिरोधा कंपनी आपला 10% नफा सामाजिक व पर्यावरणीय कामांसाठी वापरते.
• संस्थेच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त 100 कोटींचा ‘झिरोधा रीवाइल्डिंग फंड’ (Zerodha Rewilding Fund) जाहीर केला आहे.
• या उपक्रमांतर्गत देशातील पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या परिसरातील निसर्गाचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.
• रेनमॅटर फाउंडेशनमार्फत हवामान बदल व पर्यावरणीय ऱ्हास या समस्यांवर कामे करण्यात येतात.
🐅 ताडोबा-अंधारी रिवाइल्डिंग प्रकल्पाचे पर्यावरणीय महत्त्व :
• विदर्भातील जंगल संपदा वाढण्यास मदत.
• जैवविविधता पुनर्संचयित करण्यासाठी मोठी पायरी.
• वन्यजीवांसाठी उत्तम नैसर्गिक अधिवास निर्माण होणार.
• हवामान बदल आणि पर्यावरणीय ऱ्हास रोखण्यासाठी प्रभावी उपक्रम.
🤝 सरकार–कॉर्पोरेट सहकार्याचे महत्त्व :
• पर्यावरण संरक्षणात कॉर्पोरेट कंपन्यांचा सहभाग वाढल्यास मोठे प्रकल्प शक्य होतात.
• झिरोधाचा सहभाग महाराष्ट्र तसेच देशातील इतर कंपन्यांसाठी आदर्श मॉडेल ठरू शकतो.
• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा उपक्रम विदर्भाच्या विकासासाठी महत्त्वाचा व उत्साहवर्धक असल्याचे सांगितले.



















