
चालू घडामोडी | दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद | South India Natural Farming Summit

दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद
South India Natural Farming Summit
Subject : GS - भूगोल, अर्थशास्त्र - कृषी
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले ?
1. महाराष्ट्र
2. केरळ
3. कर्नाटक
4. तामिळनाडू
उत्तर : तामिळनाडू
बातमी काय ?
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कोईम्बतूर इथे दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 चे उद्घाटन केले.
दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 चे आयोजन कोणी केले ?
• 19 ते 21 नोव्हेंबर 2025 या दरम्यान तामिळनाडू नैसर्गिक शेती भागीदार मंचाच्या वतीने दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025, आयोजित करण्यात आली.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कोईम्बतूर इथे दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 चे उद्घाटन केले.
दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 चे उद्दिष्ट काय ?
• शाश्वत, पर्यावरणपूरक आणि रसायनमुक्त कृषी पद्धतींना प्रोत्साहन देणे.
• भारताच्या कृषी क्षेत्रातील भविष्यासाठी एक व्यवहार्य, हवामान-अनुकूल आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत मॉडेल म्हणून नैसर्गिक आणि पुनरुत्पादक शेतीकडे वळण्यास गती देणे, हे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे.
प्रदर्शन :
• या शिखर परिषदेत शेतकरी-उत्पादक संघटना आणि ग्रामीण उद्योजकांसाठी बाजारपेठेतील दुवे निर्माण करण्यावरही भर दिला गेला.
• त्याचबरोबर सेंद्रिय शेती, कृषी प्रक्रिया, पर्यावरणपूरक पॅकेजिंग आणि स्वदेशी तंत्रज्ञानातील नवोपक्रम प्रदर्शित केले.
नैसर्गिक शेती म्हणजे काय ?
• अशी शेती ज्यात रासायनिक खते, कीटकनाशके किंवा रसायनांचा वापर होत नाही.
• मातीतील नैसर्गिक सुपीकता आणि सूक्ष्मजीवांची क्रिया या पद्धतींवर नैसर्गिक शेती आधारित आहे.
• नैसर्गिक शेतीत स्थानिक संसाधनांचा वापर केला जातो; जसे की शेण, गोमूत्र, जैविक द्रावण, वर्मी-कंपोस्ट इत्यादी.
• नैसर्गिक शेती पर्यावरणास अनुकूल, कमी खर्चातील आणि टिकाऊ पद्धत आहे.
• नैसर्गिक शेतीत आपण भारताच्या पारंपरिक कृषी ज्ञानाची सांगड आधुनिक विज्ञानाशी घालतो.












