
चालू घडामोडी | G20 Summit | G20 शिखर परिषद

G20 Summit
G20 शिखर परिषद
Subject : GS - अर्थशास्त्र, जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) G-20 शिखर परिषद 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली ?
1. भारत
2. ब्राझील
3. इंडोनेशिया
4. दक्षिण आफ्रिका
उत्तर : दक्षिण आफ्रिका
बातमी काय ?
• नोव्हेंबर 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे G-20 शिखर परिषद संपन्न झाली.
• G-20 शिखर परिषद पहिल्यांदाच आफ्रिकन देशात आयोजित करण्यात आली.
• अमेरिका राष्ट्राध्यक्षांच्या बहिष्कारामुळे ही परिषद विशेष राजकीय चर्चेत आली.
G20 म्हणजे काय ?
• G 20 चा फूल फॅार्म Group of Twenty असा आहे.
• G-20 हा जगातील सर्वात प्रभावी आर्थिक मंच असून जागतिक अर्थव्यवस्था, हवामान बदल, व्यापार नियम, डिजिटल पायाभूत सुविधा आणि विकास उद्दिष्टांवर देशांमध्ये समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.
• G-20 जगातील 85% GDP, 75% जागतिक व्यापार, आणि 2/3 लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते.
• G-20 आधुनिक काळातील सर्वात प्रभावी जागतिक आर्थिक मंच म्हणून मानले जाते.
G-20 ची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• स्थापना : G-20 ची स्थापना 1999 साली आशियाई आर्थिक संकटानंतर जागतिक अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी झाली.
• सुरुवातीला ही वित्तमंत्री व केंद्रीय बँक गव्हर्नर यांची बैठक होती.
• 2008 च्या जागतिक आर्थिक संकटानंतर याला वार्षिक राष्ट्रनेत्यांच्या शिखर परिषदेत रूपांतरित करण्यात आले.
G-20 चे प्रमुख कार्य कोणते ?
(Functions of the G20)
1) जागतिक आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे :
• जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये मॅक्रो-इकोनॉमिक स्थिरता राखणे.
• आर्थिक मंदी, महागाई, व्यापारातील अस्थिरता यावर समन्वित धोरणे तयार करणे.
2) जागतिक नियम (Global Rules) तयार करणे :
• व्यापार, वित्तीय प्रणाली, कर (Taxation), ऊर्जा क्षेत्र आणि डिजिटल पब्लिक गुड्स यांसाठी जागतिक दर्जाचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे.
3) टिकाऊ विकास उद्दिष्टांसाठी (SDGs – Agenda 2030) निधी उभारणे :
• जगभरातील शाश्वत विकास उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वित्तपुरवठा, गुंतवणूक आणि सहकार्य वाढवणे.
• गरीब व विकसनशील देशांना विकासासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून देणे.
4) हवामान बदल आणि जागतिक असमानतेवर सामूहिक कृती :
• कार्बन उत्सर्जन कमी करणे, हरित ऊर्जा संक्रमण, कर्जमाफी, आणि जागतिक दारिद्र्य कमी करण्यासाठी सामूहिक धोरणे बनवणे.
5) विकसित आणि विकासशील देशांमधील दुवा म्हणून काम करणे :
• प्रगत अर्थव्यवस्था आणि ग्लोबल साऊथमधील देशांमध्ये विश्वास, सहकार्य आणि संवाद वाढवणे.
• त्यामुळे G-20 हे समतोल आणि समावेशक जागतिक विकासासाठी महत्वाचे व्यासपीठ ठरते.
G-20 शिखर परिषद 2025 बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• स्थान : जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका
• अध्यक्षपद/आयोजक : दक्षिण आफ्रिका
G-20 जोहान्सबर्ग शिखर परिषद 2025 – मुख्य निष्कर्ष :
• G-20 नेतृत्व घोषणा पत्राची मंजुरी (अमेरिकेच्या बहिष्कारानंतरही)
• सर्व देशांनी मिळून G-20 Leaders’ Declaration स्वीकारले.
• यात बहुपक्षीय सहकार्य, हवामान कृती, कर्जमाफी, आणि शाश्वत विकासासाठी दृढ वचनबद्धता दर्शवली.
• अमेरिका विरोधात असतानाही घोषणा पत्र मंजूर झाले, याला मोठे राजनैतिक महत्त्व आहे.
G-20 जोहान्सबर्ग शिखर परिषदेत भारताचे अनेक प्रस्ताव स्वीकारले ते पुढीलप्रमाणे :
• Global Traditional Knowledge Repository – जगातील पारंपरिक ज्ञान जतन व शेअर करण्यासाठी जागतिक संग्रह.
• Skills Multiplier for Africa – आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम.
• Global Satellite Data Partnership – हवामान, कृषी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी सामायिक उपग्रह डेटा प्रणाली.
• Healthcare Response Team – भविष्यातील आरोग्य आपत्कालीन परिस्थितीसाठी जागतिक प्रतिसाद गट.
• Anti Drug–Terror Nexus Initiative – ड्रग्स आणि दहशतवाद यांच्यातील संबंध तोडण्यासाठी जागतिक मोहीम.












