
चालू घडामोडी | तेजस फाइटर जेट दुबई एयर शोमध्ये दुर्घटनाग्रस्त | LCA Tejas Crashed

तेजस फाइटर जेट दुबई एयर शोमध्ये दुर्घटनाग्रस्त
LCA Tejas Crashed
Subject : GS - संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दुबई एयर शोमध्ये भारतीय वायुसेनेचा कोणता स्वदेशी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) एरियल शोदरम्यान दुर्घटनाग्रस्त झाला ?
1. मिग-29
2. तेजस
3. राफेल
4. सुखोई-30
उत्तर : तेजस
बातमी काय ?
• दुबई एयर शोदरम्यान भारतीय वायुसेनेचा स्वदेशी तेजस फाइटर जेट स्टंट परफॉर्मन्स करताना दुर्घटनाग्रस्त झाले.
• या अपघातात पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांचा मृत्यू झाला.
• या घटनेनंतर तेजसच्या उड्डाण सुरक्षा, एरियल डिस्प्ले प्रोटोकॉल व ऑपरेशनल प्रक्रियेची पुनर्तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तेजस फाइटर जेट बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• तेजस हा भारताने Hindustan Aeronautics Limited (HAL) आणि Aeronautical Development Agency (ADA) यांच्या सहकार्याने विकसित केलेला हलका व बहुपयोगी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) आहे.
• भारतीय वायुसेनेतील अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेला हे विमान प्रगत एवियोनिक्स व उन्नत शस्त्र प्रणालीने सुसज्ज आहे.
• 24 वर्षांत फक्त दोन दुर्घटना झाल्यामुळे याचा सुरक्षा रेकॉर्ड अत्यंत मजबूत मानला जातो.
तेजसची मुख्य वैशिष्ट्ये कोणती ?
• मल्टी-रोल क्षमता – एयर-टू-एअर व एयर-टू-ग्राउंड मिशन करण्याची क्षमता
• अत्याधुनिक प्रणाली – डिजिटल फ्लाय-बाय-वायर, ग्लास कॉकपिट
• उच्च गतिशीलता – हलके वजन, एयरोडायनमिक डिझाइन
• उन्नत शस्त्रसज्जता – BVR मिसाइल, लेझर-गाइडेड बम, 23mm कॅनन
• स्वदेशी तंत्रज्ञान – 60 % पेक्षा अधिक घटक भारतात विकसित
• सुरक्षा रेकॉर्ड – 24 वर्षांत फक्त दोन दुर्घटना
• आंतरराष्ट्रीय प्रदर्शन – विविध एयर शोमध्ये प्रशंसनीय परफॉर्मन्स
दुर्घटना का झाली असावी ?
• प्राथमिक तपासणीत दिसते की तांत्रिक बिघाड नसून, Barrel Roll करताना अतिजलद गती व कमी उंची यामुळे नियंत्रण सुटल्याची शक्यता आहे.
• यामुळे एरियल स्टंटसाठी उंची व स्पीड लिमिट अधिक कडक करण्याची गरज भासते.
तेजस फाइटर जेट दुर्घटनेचा प्रभाव कसा होऊ शकतो ?
घटनेचा वायुसेनेवर प्रभाव :
• पायलटचे निधन हे मोठे नुकसान असून, अशा घटना मनोबलावर परिणाम करतात.
• मात्र, वायुसेना यामुळे सुरक्षा प्रक्रिया अधिक मजबूत करण्यावर भर देईल.
आंतरराष्ट्रीय प्रतिमा व निर्यात यांवर प्रभाव :
• ही दुर्घटना तात्पुरता प्रभाव टाकू शकते, पण तेजसचा मजबूत सुरक्षा रेकॉर्ड त्याची विश्वासार्हता कायम ठेवतो.
• निर्यात इच्छुक देश पुन्हा तांत्रिक मूल्यांकन करतील, परंतु प्रोजेक्टची गती कमी होणार नाही.
भविष्यातील एयर शो नियमां बद्दल :
• स्टंट करताना किमान उंची, गती मर्यादा व उड्डाण मार्ग कठोरपणे निर्धारित केले जातील.
• डेमो फ्लाइट प्रोटोकॉलचा सुरक्षा ऑडिट अधिक बारकाईने केला जाईल.
तेजस कार्यक्रमावर एकूण परिणाम :
• ही एक स्वतंत्र घटना असून तेजस प्रकल्पावर कोणताही मोठा नकारात्मक परिणाम होणार नाही.
• भारताचा दीर्घकालीन रणनीतिक फोकस सुरूच राहील व सुरक्षा सुधारणा तत्काळ लागू केल्या जातील.

















