
चालू घडामोडी | महिला सैनिकांना प्रादेशिक सैन्य बटालियनमध्ये सामील होण्याची संधी | Women Soldiers to Join Territorial Army Battalions

महिला सैनिकांना प्रादेशिक सैन्य बटालियनमध्ये सामील होण्याची संधी
Women Soldiers to Join Territorial Army Battalions
Subject : GS- संरक्षण (Defence)
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) प्रादेशिक सेना स्थापना दिवस केव्हा असतो ?
1. 26 जानेवारी
2. 15 ऑगस्ट
3. 9 ऑक्टोबर
4. 2 डिसेंबर
उत्तर : 9 ऑक्टोबर
बातमी काय ?
• भारतात प्रथमच महिलांना Territorial Army (TA) च्या Home & Hearth पायदळ तुकड्यांमध्ये (H&H Infantry Battalions) सामील केले जाणार आहे.
• ही पॉलिसी महिला सैनिकांसाठी नवी संधी उघडते आणि संरक्षण क्षेत्रात त्यांची भूमिका मोठी करते.
प्रादेशिक सेना म्हणजे काय ?
What is Territorial Army (TA) ?
• TA हे Part-time Voluntary सैन्यदल आहे . म्हणजे नागरिक स्वतःची नोकरी करत असतानाच सैन्यातही सेवा देऊ शकतात.
• प्रादेशिक सेना, रेगुलर इंडियन आर्मी ला मदत करते आणि नागरिकांना सैन्यात सेवा करण्याची संधी देते.
• TA ची संकल्पना “Sons of Soil म्हणजेच " स्थानिक नागरिक स्वतःच्या प्रदेशाचे रक्षण करतात " अशी आहे.
• TA अधिकारी मिलिटरी ट्रेनिंग घेतात त्यांना शिस्त, शस्त्र वापर, फील्ड तंत्र इत्यादी कौशल्य शिकवले जाते.
प्रादेशिक सेनेची स्थापना केव्हा करण्यात आली ?
प्रादेशिक सेनेचा स्थापना दिवस केव्हा असतो ?
• टेरिटोरियल आर्मी म्हणजेच प्रादेशिक सेनेची स्थापना 9 ऑक्टोबर 1949 मध्ये करण्यात आली.
• स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांनी 9 ऑक्टोबर 1949 मध्ये टेरिटोरियल आर्मीचे औपचारिक उद्घाटन केले.
• TA प्रादेशिक सेना अधिनियम 1948 (Territorial Army Act, 1948) अंतर्गत कार्य करते.
• 9 ऑक्टोबर हा दिवस प्रादेशिक सेनेचा स्थापना दिवस (Territorial Army Raising Day) म्हणून साजरा करण्यात येतो.
प्रादेशिक सेनेच्या स्थापनेचा उद्देश कोणता ?
• संकटकाळात देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी पेलणे,
• आवश्यकता निर्माण झाल्यास नियमित सेनेला मदत करणे,
• देशातील तरुणांना नागरी जीवनाबरोबरच सैन्यदलात सेवा करुन देशसेवेची संधी देणे या उद्देशाने प्रादेशिक सेनेची स्थापना केली.
महिलांचा Territorial Army मध्ये समावेश का महत्त्वाचा आहे ?
• प्रादेशिक सैन्याने 2019 मध्ये महिला अधिकाऱ्यांना कमिशन देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्यांना इकोलॉजिकल टास्क फोर्स युनिट्स, ऑइल सेक्टर टीए युनिट्स आणि रेल्वे इंजिनिअर रेजिमेंटमध्ये काम करण्याची परवानगी मिळाली.
• मिळालेल्या सकारात्मक अनुभवामुळे, लष्कराने आता त्यांच्या भूमिकांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे आणि महिला सैनिकांना होम अँड हर्थ बटालियनमध्ये (Home & Hearth Infantry Battalions) समाविष्ट करण्याची तयारी करत आहे.
• यामुळे महिलांना अधिक जबाबदाऱ्या, फील्ड ऑपरेशन्स आणि रणनीतिक भूमिका मिळतील.
• देशातील आंतरिक सुरक्षा (Internal Security), आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) यासाठी अधिक मनुष्यबळ उपलब्ध होईल.
• संरक्षण क्षेत्रात Gender Inclusion म्हणजेच स्त्री-पुरुष समानता वाढेल.











