
चालू घडामोडी | राणी लक्ष्मीबाई | Rani Lakshmibai

राणी लक्ष्मीबाई जयंती
Rani Lakshmibai Birth Anniversary
Subject : GS - इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव काय होते ?
1. मणिकर्णिका
2. राणूबाई
3. अहिल्याबाई
4. सखुबाई
उत्तर : मणिकर्णिका (Manikarnika)
राणी लक्ष्मीबाई यांबद्दल परीक्षेसाठी महत्त्वाची माहिती :
• राणी लक्ष्मीबाई या भारताच्या इतिहासातील सर्वात शूर महिलांपैकी एक मानल्या जातात.
• 1857 च्या क्रांतीत त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध झाशीचे नेतृत्व केले आणि शेवटपर्यंत लढल्या.
• केवळ 29 वर्षांच्या वयात त्यांचे बलिदान झाले, पण त्यांच्या धाडसाने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली.
जन्म आणि शिक्षण :
• जन्म : राणी लक्ष्मीबाईंचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी वाराणसी येथे झाला.
• त्यांचे बालपणीचे नाव मणिकर्णिका तांबे (मनु) होते.
• वडील मोरोपंत तांबे पेशव्यांच्या दरबारात काम करत असल्यामुळे त्यांना लहानपणापासून राजदरबाराचे वातावरण मिळाले.
• आईचे निधन लहान वयात झाल्यामुळे मनुचे संगोपन त्यांच्या वडिलांनीच केले.
• लहानपणापासूनच मनु धाडसी आणि खेळकर स्वभावाची होती.
• त्यांनी घोडेस्वारी, तलवारबाजी आणि शस्त्रविद्या यांचे कठोर प्रशिक्षण घेतले.
• नाना साहेब आणि तात्या टोपे या क्रांतिकारकांसोबत लहान मनु वाढली.

विवाह आणि राजकीय जीवन :
• 1842 मध्ये त्यांचा विवाह झाशीचे राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला आणि त्यांना “लक्ष्मीबाई” हे नाव मिळाले.
• 1851 मध्ये त्यांना एक मुलगा झाला पण तो काही महिन्यांतच मरण पावला.
• राजाने दामोदर राव यांना दत्तक घेतले, पण डलहौजीच्या खालसा धोरणा नुसार ब्रिटिशांनी या दत्तकपणाला मान्यता दिली नाही.
• त्यामुळे झाशी राज्य हक्काने ब्रिटिशांनी ताब्यात घेतले.
• "मैं अपनी झाँसी नहीं दूंगी!" म्हणत राणीने ब्रिटिशां विरूद्ध बंड पुकारले.
1857 चा उठाव :
• 1857 च्या उठावात झाशीमध्येही मोठी बंडाळी झाली आणि राणी पुढाकार घेऊन राज्याचे रक्षण करू लागल्या.
• त्यांनी स्वतःची सेना तयार केली, ज्यामध्ये महिलांचीही एक विशेष तुकडी होती.
• मार्च 1858 मध्ये जनरल ह्यूग रोज (General Hugh Rose) याने झाशीवर हल्ला केला, पण राणीने जबरदस्त प्रतिकार केला.
• राणी घोड्यावर बसून, तलवारीने लढत, दामोदर रावांना पाठीवर बांधून युद्धात उतरल्या — अशी दृश्ये त्यांच्या शौर्याचे उदाहरण आहेत.
• झाशी पडल्यावर त्या कालपी आणि नंतर ग्वालियरला गेल्या, जिथे त्यांनी पुन्हा सैन्य उभारले.
मृत्यू :
• 18 जून 1858 रोजी ग्वालियरच्या युद्धात राणी लक्ष्मीबाई शत्रूशी लढता-लढता वीरगतीला प्राप्त झाल्या.
‘डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स’ म्हणजे काय ?
What was the Doctrine of Lapse ?
• लॉर्ड डलहौसीचे खालसा धोरण याला ‘ डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स ’ किंवा ‘व्यपगत सिद्धांतʼ असेही म्हणतात.
• ‘ डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स ’ हे एक धोरण होते, ज्या अंतर्गत जर राजाचा नैसर्गिक वारस नसेल तर त्याचे राज्य ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये विलीन केले जात असे.
• या धोरणाचे उद्दिष्ट ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करणे हा होता.













