
चालू घडामोडी | राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2025 | National Gopal Ratna Award 2025

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2025
National Gopal Ratna Award 2025
Subject : GS- पुरस्कार, सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2025 जिंकणारे महाराष्ट्रातील विजेते कोण ?
1. अरविंद पाटील आणि सागर बागडे
2. श्रद्धा धवन आणि अरविंद पाटील
3. दिगंबर नाईक आणि श्रद्धा धवन
4. सागर बागडे आणि दिगंबर नाईक
उत्तर : श्रद्धा धवन आणि अरविंद पाटील
बातमी काय ?
• पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2025 च्या विजेत्यांची अधिकृत घोषणा केली आहे.
• या वर्षी एकूण 2,081 अर्ज प्राप्त झाले.
• त्यातून उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर विजेते निवड करण्यात आले.
• यामध्ये महाराष्ट्रातील 2 शेतकऱ्यांना देशी गायी /म्हशींच्या जातींचे पालन करणारे सर्वोत्तम दुग्ध उत्पादक या श्रेणीत पुरस्कार मिळाले आहेत.
राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2025 जिंकणारे महाराष्ट्रातील विजेते कोण ?
🥇 प्रथम क्रमांक : अरविंद यशवंत पाटील, कोल्हापूर, महाराष्ट्र
🥈 द्वितीय क्रमांक : डॉ. कंकनाला कृष्णा रेड्डी, हैदराबाद, तेलंगणा
🥉 तृतीय क्रमांक : कुमारी श्रद्धा सत्यवान धवन, अहमदनगर, महाराष्ट्र
राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार म्हणजे काय ? तो कोणाला देण्यात येतो ?
• राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार हा पशुधन व दुग्धव्यवसाय क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानांपैकी एक आहे.
• देशातील उत्कृष्ट दुग्ध उत्पादक, पशुपालक, डेअरी संस्थांना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
• राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत 2021 पासून दूध उत्पादक शेतकरी, दुग्ध सहकारी संस्था, दूध उत्पादक कंपनी शेतकरी उत्पादक संघटना आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञान यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार देण्यात येतो.
• मंत्रालय : हा पुरस्कार मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या (Ministry of Fisheries, Animal Husbandry and Dairying)अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागातर्फे देण्यात येतो.
राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार केव्हा देण्यात येतो ?
• 26 नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय दूध दिना निमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
खालील श्रेणींसाठी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार दिला जात आहे :
• सर्वोत्तम दूध उत्पादक शेतकरी जो देशी गायी/म्हशींच्या जातींचे संगोपन करतो.
• सर्वोत्कृष्ट दुग्ध सहकारी संस्था / दूध उत्पादक कंपनी / शेतकरी उत्पादक संघटना
• सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (AIT- Artificial Insemination Technician)
पुरस्काराचे स्वरूप :
• राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2025 मध्ये गुणवत्तेचे प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि पहिल्या दोन श्रेणींमध्ये - सर्वोत्कृष्ट दुग्ध उत्पादक शेतकरी आणि सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट दुग्ध सहकारी संस्था / दूध उत्पादक कंपनी / शेतकरी उत्पादक संघटना यांचा समावेश असेल.
🥇 प्रथम पुरस्कार - 5 लाख रुपये
🥈 द्वितीय पुरस्कार - 3 लाख रुपये
🥉 तृतीय पुरस्कार - 2 लाख रुपये
🏅 ईशान्य प्रदेश/हिमालयीन राज्यांसाठी विशेष पुरस्कार : 2 लाख रुपये (ईशान्य क्षेत्रासाठी विशेष पुरस्कार)




















