
चालू घडामोडी | क्लायमेट रिस्क इंडेक्स | Climate Risk Index

क्लायमेट रिस्क इंडेक्स
Climate Risk Index
Subject : GS - पर्यावरण, जागतिक रिपोर्ट
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) क्लायमेट रिस्क इंडेक्स (CRI) खालील पैकी काय मोजतो ?
1. जगातील सर्वाधिक प्रदूषित देश
2. समुद्रातील पाण्याची खारटपणा वाढ
3. तीव्र हवामान घटनांमुळे देशांवर झालेली मानवी आणि आर्थिक हानी
4. ओझोन थरातील होणारे बदल
उत्तर : तीव्र हवामान घटनांमुळे देशांवर झालेली मानवी आणि आर्थिक हानी
बातमी काय ?
• Germanwatch ने प्रकाशित केलेला Climate Risk Index 2026 हा रिपोर्ट जगातील देशांवर वादळ, पूर, उष्णतेच्या लाटा यांसारख्या तीव्र हवामान घटनांचा किती परिणाम झाला याचे विश्लेषण करतो.
• 1995 ते 2024 या 30 वर्षांत जगभरात 9,700 पेक्षा जास्त हवामान आपत्ती घडल्या.
• या घटनांमध्ये 8.32 लाख लोकांचा मृत्यू झाला आणि $4.5 ट्रिलियन पेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले.
• भारत हा हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावित देशांपैकी एक ठरला आहे.
Climate Risk Index म्हणजे काय ?
• हा इंडेक्स भूतकाळात घडलेल्या तीव्र हवामान घटनांचे आकडे तपासतो आणि त्या घटनांनी लोकांचे जीवन व अर्थव्यवस्था किती बिघडली ते दाखवतो.
• म्हणजेच, हवामान बदलाचे प्रत्यक्ष आणि मोजता येणारे परिणाम हा इंडेक्स स्पष्ट करतो.
क्लायमेट रिस्क इंडेक्स कोण प्रकाशित करतं ?
• Climate Risk Index (CRI) हा इंडेक्स Germanwatch नावाच्या जर्मनीतील पर्यावरणीय थिंक-टँक (environmental think tank) संस्था प्रकाशित करते.
• ही संस्था जगभरातील हवामान आपत्तींचा परिणाम — म्हणजे मृत्यू, आर्थिक नुकसान आणि देशांची असुरक्षितता — याचे विश्लेषण करून हा रिपोर्ट तयार करते.
CRI कसा मोजला जातो ?
• मृत्यूंची संख्या : मोठ्या हवामान घटनांमध्ये किती लोकांचा मृत्यू झाला हे दाखवते.
• प्रति 1 लाख लोकसंख्येत मृत्यू : लोकसंख्येच्या तुलनेत देश किती असुरक्षित आहे याचे मोजमाप.
• Purchasing power parity (PPP) मध्ये नुकसान : आर्थिक नुकसान आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलनात्मक पद्धतीने मोजले जाते.
• Gross Domestic Product (GDP) च्या तुलनेत नुकसान : हवामान घटनेने अर्थव्यवस्थेवर किती मोठा परिणाम झाला ते कळते.
CRI ची मर्यादा कोणत्या ?
• हा इंडेक्स फक्त अचानक घडणाऱ्या हवामान आपत्ती जसे वादळ, पूर यांनाच मोजतो.
• समुद्राची पातळी वाढणे किंवा हिमनद्या वितळणे यांसारखे हळूहळू घडणारे परिणाम यात समाविष्ट नसतात.
CRI 2026 नुसार जगातील मुख्य निष्कर्ष :
• मागील 30 वर्षांत जगभरात 8,32,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू हवामान आपत्तींमुळे झाला आहे.
• 9,700+ हवामान घटना नोंदल्या गेल्या, म्हणजे जवळपास दररोज एक घटना.
• वादळे आणि उष्णतेच्या लाटा या घटनांमुळे सर्वाधिक मृत्यू झाले, म्हणजे या घटना मानवी जीवनासाठी अत्यंत धोकादायक आहेत.
• पूरांमुळे सर्वाधिक लोक प्रभावित झाले, कारण पूर ग्रामीण-शहरी भागांना मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवतात.
• वादळांमुळे एकूण आर्थिक नुकसानीपैकी 58% नुकसान झाले, म्हणजे जवळपास 2.64 ट्रिलियन डॅालर
भारताची स्थिती — अत्यंत असुरक्षित देशांमध्ये :
• भारताची लांब किनारपट्टी, मान्सून-आधारित शेती, आणि मोठी लोकसंख्या यामुळे हवामान घटनांचा धोका जास्त वाढतो.
• 1995–2024 या काळात भारत हा जगातील 9 वा सर्वाधिक प्रभावित देश ठरला आहे.
• या काळात भारतात 430 तीव्र हवामान घटना झाल्या—जवळजवळ वर्षाला 14 घटना.
• या घटनांमध्ये 80,000 पेक्षा जास्त मृत्यू झाले आणि 170–180 अब्ज डॅालर इतकेआर्थिक नुकसान झाले.
भारतावर सर्वाधिक परिणाम करणाऱ्या घटना कोणत्या ?
• चक्रीवादळे : किनारपट्टी राज्यांना थेट जोरदार धक्का देतात आणि शेती, घरे, वीजव्यवस्था यांचे मोठे नुकसान करतात.
• पूर आणि अतिवृष्टी : मान्सूनमधील अनियमित पावसामुळे गावं-शहरे पाण्यात बुडतात आणि लाखो लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते.
• उष्णतेच्या लाटा (Heatwaves) : तापमान खूप वाढते, ज्याचा आरोग्य आणि पिकांवर गंभीर परिणाम होतो.
• दुष्काळ : पावसाअभावी शेती, पाणी उपलब्धता आणि जनजीवन प्रभावित होते.
निष्कर्ष :
• Climate Risk Index स्पष्ट दाखवतो की हवामान बदलाचा भारतावर प्रचंड आणि सतत परिणाम होत आहे.
• भविष्यात या घटनांचा धोका आणखी वाढण्याची शक्यता असल्याने, देशाने जलद तयारी, Early Warning Systems, आणि हवामान-प्रतिरोधक पायाभूत सुविधा मजबूत करण्याची गरज आहे.















![[ karkrogachi pramukh lakshane, vegane vajan kami hone, satyatane yenara khokla, raktasarav, raktachya gathi hone, potat dukhne, kayam thakva janavane, वेगाने वजन कमी होणे, सातत्याने येणारा खोकला, रक्तस्त्राव, रक्ताच्या गाठी येणे, कायम थकवा जाणवने, पोटात दुखणे इत्यादी. ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Cancer_Symptomps_1731313743199.webp)
![[ sthanacha karkrog, breast cancer, tondacha karkrog, mouth cancer, ghasyacha karkrog, throat cancer, fufusyacha karkrog, lung cancer ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Types_of_Cancer_1731313683225.webp)



