
चालू घडामोडी | क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे | Krantiguru Lahuji Salve

क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे
Krantiguru Lahuji Salve
क्रांतिकारकांचे क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची आज जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मनोभावाने मानवंदना करून जाणून घेऊया त्यांचा जीवन प्रवास
Subject : GS - महाराष्ट्राचा इतिहास, दिनविशेष, व्यक्ती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला ?
1. मुंबई
2. पुणे
3. रत्नागिरी
4. नाशिक
उत्तर : पुणे
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांबद्दल IMP वनलाईनर पॉईंट्स :
• जन्म : क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1794 रोजी पुण्यातील पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ या गावी झाला.
• लहुजी हे राघोजी साळवे आणि विठाबाई साळवे यांचे पुत्र होते.
• छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज काम करत; त्यांच्या कामगिरीमुळे छत्रपतींनी लहुजींच्या पूर्वजांना राऊत ही पदवी बहाल केली.
• पूर्वजांप्रमाने लहुजीही युद्धकलेत निपुण होते.
• दांड पट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी या सर्व युद्धकलेमध्ये क्रांतिगुरू लहुजी साळवे निपुण होते.
• देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांची सेना त्यांनी निर्माण केली.
• त्यांच्या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजाचे युवक तालीम घेत होते.
• लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चाफेकर बंधू यांसारखे अनेक स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या तालमीत तयार झाले.
राष्ट्रभक्तीचा संदेश :
• राष्ट्रभक्तीचे ज्वलंत प्रतीक क्रांतीगुरू लहुजी साळवे यांनी तरुणांना संघटन कसे करावे, समाजकार्यात व राष्ट्रकार्यात स्वतःला वाहून कसे घ्यावे याची बोध दिले.
• त्यांच्या या शिकवणीतून अनेक क्रांतिकारकांनी तसेच समाजकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपले मोलाचे योगदान दिले.
मृत्यू :
• 17 फेब्रुवारी 1881 रोजी पुण्याच्या संगमवाडी या ठिकाणी त्यांची प्राणज्योत मावळली.
• आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची समाधी संगमवाडी, पुणे येथे आहे




















