
चालू घडामोडी | न्यूयॉर्कच्या महापौरपदी भारतीय वंशाचे व्यक्ती | Indian-origin mayor of New York

न्यूयॉर्कच्या महापौरपदी भारतीय वंशाचे व्यक्ती
Indian-origin Mayor of New York
Subject : GS : जागतिक घडामोडी, व्यक्ती, महत्त्वाची शहरे
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) न्यूयॉर्क सिटीचे नवीन मेयर म्हणून खालील पैकी कोणते भारतीय वंशाचे व्यक्ती निवडून आले ?
1. सुंदर पिचाई
2. जोहरान ममदानी
3. शंतनु नारायण
4. सोनिया अग्रवाल
उत्तर : जोहरान ममदानी (Zohran Mamdani)

बातमी काय ?
• न्यू यॉर्क शहरातील नुकत्याच झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या जोहरान ममदानी यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
• त्यांनी माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांचा पराभव केला.
• ममदानींचा विजय अमेरिकेतील "लोकशाही समाजवाद" (Democratic Socialism) या विचारधारेसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
न्यूयॉर्क मेयर निवडणूक इतकी महत्वाची का आहे ?
• ही अमेरिका देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रभावशाली शहरी निवडणुकांपैकी एक आहे.
• या पदाला अमेरिकेतील “दुसरे सर्वात शक्तिशाली राजकीय पद” मानले जाते.
• मेयर शहराचे प्रशासन, बजेट, शिक्षण, परिवहन, पोलीस, आणि हवामान धोरण यावर निर्णय घेतात.
निवडणूक प्रक्रिया कशी असते ? आणि निवडणूक किती वर्षांनी होते ?
• मेयरची निवडणूक दर 4 वर्षांनी होते.
• नागरिक थेट मतदान करून मेयर निवडतात.
• उमेदवार सामान्यतः डेमोक्रॅटिक किंवा रिपब्लिकन पक्षाचे असतात.
• सर्वाधिक मत मिळवणारा उमेदवार मेयर बनतो.
जोहरान ममदानी कोण आहेत ?
• ते भारतीय वंशाचे असून डेमोक्रेटिक सोशलिस्ट्स ऑफ अमेरिका (Democratic Socialists of America) पार्टीचे सदस्य आहेत.
• त्यांनी 50.4% मते मिळवून विजय मिळवला.
• ममदानी यांनी भाडेवाढ, सार्वत्रिक बालसंगोपन, सार्वजनिक किराणा दुकाने, मोफत बस सेवा आणि परवडणारी गृहनिर्माण योजना यासारख्या धोरणांचे आश्वासन दिले.
• त्यांचा मुख्य विचार - “Decommodification”, म्हणजे माणसाच्या मूलभूत गरजा या बाजारावर नव्हे तर सामाजिक अधिकारावर आधारित असाव्यात, असा आहे.
न्यूयॉर्क शहराबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• अमेरिका देशातील सर्वात मोठे आणि प्रभावशाली शहर.
• संयुक्त राष्ट्र संघाचे (UN) मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे.
• न्यूयॉर्क हे शहर अमेरिकेची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते.
• "द बिग अॅपल" (The Big Apple) हे न्यू यॉर्क शहराचे टोपणनाव आहे.
• जगातील सर्वात मोठी मेट्रो रेल्वे प्रणाली न्यू यॉर्क येथे आहे.
• लोकसंख्या : सुमारे 85 लाख
• बजेट : 100 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक — जगातील सर्वात मोठ्या महानगर बजेटपैकी एक.
• अर्थव्यवस्था : जगातील सर्वात मोठ्या शहरी अर्थव्यवस्थांपैकी एक; येथे Wall Street आहे.

















