
चालू घडामोडी | जागतिक विज्ञान दिवस | World Science Day

जागतिक विज्ञान दिवस
World Science Day
Subject : GS - दिनविशेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक विज्ञान दिन खालील पैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1. 1 नोव्हेंबर
2. 5 नोव्हेंबर
3. 10 नोव्हेंबर
4. 21 नोव्हेंबर
उत्तर : 10 नोव्हेंबर
जागतिक विज्ञान दिना बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर :
• दरवर्षी 10 नोव्हेंबर रोजी, शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन साजरा करण्यात येतो.
• 2001 मध्ये UNESCO ने जागतिक विज्ञान दिनाची स्थापन केली.
• हा दिवस, जागतिक शांतता आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी विज्ञानाच्या महत्त्वावर जोर देण्यासाठी समर्पित आहे.
• दरवर्षी, हा दिवस हवामान बदल, आरोग्य संकटे आणि जैवविविधतेची हानी यासारख्या महत्त्वाच्या जागतिक आव्हानांचे निराकरण करण्यात विज्ञानाच्या आवश्यक भूमिकेकडे लक्ष वेधतो.
(नोट : UNESCO : United Nations Educational, Scientific and Cultural Organization.
UNESCO ही संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था आहे.)
पहिला जागतिक विज्ञान दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• UNESCO च्या संयुक्त विद्यमाने 10 नोव्हेंबर 2002 रोजी जगभरात शांतता आणि विकासासाठी पहिला जागतिक विज्ञान दिन साजरा करण्यात आला.

जागतिक विज्ञान दिवस साजरा करण्याचे प्रमुख उद्दिष्ट कोणते आहे ?
जागतिक विज्ञान दिवस का साजरा करण्यात येतो ?
• विज्ञानाचा शांतता आणि विकासाबद्दलचा जनमानसातील दृष्टिकोन अधिक प्रगल्भ करणे.
• विविध देशांमध्ये वैज्ञानिक संशोधनाची देवाणघेवाण करणे.
• राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विज्ञान समित्यांची अथवा व्यासपीठांची स्थापना करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे.
• येणाऱ्या समस्यांकडे वैज्ञानिक जगताचे लक्ष वेधणे.
• सामान्य जनमानसात विज्ञानाबद्दल जागृती वाढावी, विज्ञानाचा शांततेसाठी व विकासासाठी वापर व्हावा यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
जागतिक विज्ञान दिवस 2025 ची संकल्पना थीम काय आहे ? त्या संकल्पनेचा अर्थ काय आहे ?
• 2025 साठी जागतिक विज्ञान दिनाची थीम आहे — “Trust, transformation, and tomorrow : The Science we Need for 2050.”
• या थीमचा अर्थ असा आहे की विज्ञानावर विश्वास, समाजासाठी बदल घडवणारे विज्ञान, आणि उज्ज्वल भविष्य तयार करण्यासाठी विज्ञानाची गरज आहे.
• 2050 पर्यंत हवामान, आरोग्य, अन्न, ऊर्जा यांसारख्या मोठ्या समस्या सोडवण्यासाठी विज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे.
भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरी करण्यात येतो ?
• 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.













![[ karkrogachi pramukh lakshane, vegane vajan kami hone, satyatane yenara khokla, raktasarav, raktachya gathi hone, potat dukhne, kayam thakva janavane, वेगाने वजन कमी होणे, सातत्याने येणारा खोकला, रक्तस्त्राव, रक्ताच्या गाठी येणे, कायम थकवा जाणवने, पोटात दुखणे इत्यादी. ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Cancer_Symptomps_1731313743199.webp)
![[ sthanacha karkrog, breast cancer, tondacha karkrog, mouth cancer, ghasyacha karkrog, throat cancer, fufusyacha karkrog, lung cancer ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Types_of_Cancer_1731313683225.webp)




