
चालू घडामोडी | भारतीय हॉकी शताब्दी सोहळा | India Celebrates 100 Years of Hockey

भारतीय हॉकी शताब्दी सोहळा
India Celebrates 100 Years of Hockey
Subject : GS - दिनविशेष, खेळ
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बाबत योग्य विधान/ विधाने असलेला पर्याय निवडा.
अ) 2025 या वर्षी भारतीय हॉकीला 100 वर्षे पूर्ण झाले.
ब) भारतातील पहिला हॉकी क्लब 1855 मध्ये कोलकात्यात (Calcutta Hockey Club) स्थापन झाला.
पर्याय :
1. फक्त अ बरोबर
2. फक्त ब बरोबर
3. अ आणि ब दोन्ही बरोबर
4. अ आणि ब दोन्ही चूक
उत्तर : अ आणि ब दोन्ही बरोबर
बातमी काय ?
• भारतीय हॉकीला 100 वर्षे (1925–2025) पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने 7 नोव्हेंबर रोजी भव्य शताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
• या सोहळ्याची घोषणा युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केली आहे.
• हा सोहळा हॉकी इंडिया च्या सहकार्याने आयोजित केला जाणार असून, देशभरातील 550 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये या निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
• या उपक्रमाचा उद्देश म्हणजे भारतीय हॉकीचा गौरवशाली वारसा, खेळाडूंचे योगदान आणि तरुणांमध्ये खेळाबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे.
हॉकीची सुरुवात कशी झाली ?
• हॉकीचा इतिहास खूप जुना आहे, सुमारे 4,000 वर्षांपूर्वीपासून हा खेळ अस्तित्वात असल्याचे मानले जाते.
• त्याचे पहिले उल्लेख इराण, इजिप्त आणि ग्रीस या प्राचीन संस्कृतींमध्ये आढळतात.
• नंतर या खेळाचे आधुनिक स्वरूप ब्रिटनमध्ये (युनायटेड किंगडम) विकसित झाले, जिथे हॉकीचे अधिकृत नियम तयार करण्यात आले.
• ब्रिटिश कालावधीत 1850 च्या दशकात हा खेळ भारतात आला.
• भारतातील पहिला हॉकी क्लब 1855 मध्ये कोलकात्यात (Calcutta Hockey Club) स्थापन झाला.
भारतीय हॉकी महासंघा ची स्थापना केव्हा करण्यात आली ?
(SSC Steno 2020, SSC CGL 2024.. )
• 7 नोव्हेंबर 1925 रोजी, हॉकी खेळासाठी देशातील पहिली प्रशासकीय संस्था, भारतीय हॉकी महासंघ (Indian Hockey Federation) ची स्थापना झाली
भारताने किती ऑलिंपिक पदके जिंकली आहेत ?
• भारताने 13 ऑलिंपिक पदके जिंकली आहेत.
• या 13 ऑलिंपिक पदकांपैकी 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कांस्य पदके आहेत.
भारताने किती हॉकी विश्वचषक जिंकले आहे ?
• भारताने आत्तापर्यंत एकदाच हॉकी विश्वचषक जिंकला आहे.
• भारताने 1975 मध्ये मलेशियातील क्वालालंपूर येथे हॉकी विश्वचषक जिंकला.
प्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू :
• मेजर ध्यानचंद — “हॉकीचा जादूगार” म्हणून प्रसिद्ध
• बलबीर सिंग सीनियर, धनराज पिल्ले, हरमनप्रीत सिंग — आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू
• महिलांमध्ये — राणी रामपाल, सविता पुनिया यांचे उल्लेखनीय योगदान







![[ karkrogachi pramukh lakshane, vegane vajan kami hone, satyatane yenara khokla, raktasarav, raktachya gathi hone, potat dukhne, kayam thakva janavane, वेगाने वजन कमी होणे, सातत्याने येणारा खोकला, रक्तस्त्राव, रक्ताच्या गाठी येणे, कायम थकवा जाणवने, पोटात दुखणे इत्यादी. ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Cancer_Symptomps_1731313743199.webp)
![[ sthanacha karkrog, breast cancer, tondacha karkrog, mouth cancer, ghasyacha karkrog, throat cancer, fufusyacha karkrog, lung cancer ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Types_of_Cancer_1731313683225.webp)












