
चालू घडामोडी | जागतिक त्सुनामी जनजागृती दिवस | World Tsunami Awareness Day

जागतिक त्सुनामी जनजागृती दिवस
World Tsunami Awareness Day
Subject : GS - दिनविशेष, पर्यावरण, भूगोल - आपत्ती व्यवस्थापन
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक त्सुनामी जनजागृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1. 1 नोव्हेंबर
2. 5 नोव्हेंबर
3. 9 नोव्हेंबर
4. 21 नोव्हेंबर
उत्तर : 5 नोव्हेंबर
जागतिक त्सुनामी जागरुकता दिवस केव्हा स्थापन करण्यात आला ?
• जागतिक त्सुनामी जागरुकता दिवस 2015 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) स्थापन केला.
• त्सुनामीसह जपानच्या ऐतिहासिक अनुभवांपासून प्रेरित होऊन 5 नोव्हेंबर हा दिवस निवडला गेला.
• 5 नोव्हेंबर हा दिवस “इनामुरा-नो-हाय” (Inamura-no-hi) या कथेच्या स्मरणार्थ निवडला गेला, ज्यामध्ये एका जपानी गावकऱ्याने आपल्या शेजाऱ्यांना इशारा म्हणून तांदळाच्या ढिगाऱ्यांना आग लावली आणि येणाऱ्या सुनामीपासून त्यांचे प्राण वाचवले.
जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस का साजरी करतात ?
• त्सुनामी कशामुळे होते, त्यांचे परिणाम आणि आपण कोणती सुरक्षित पावले उचलू शकतो याबद्दल लोकांना माहिती देण्यासाठी
• या गोष्टी समजून घेतल्याने, आपण त्सुनामीमुळे होणारे नुकसान कमी करू शकतो आणि जीव वाचवू शकतो.
• हा दिवस जगभरातील लोकांना त्सुनामीपासून धोका असलेल्या क्षेत्रांचे संरक्षण करण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी प्रोत्साहित करतो.
• जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस त्सुनामी सज्जता, प्रतिसाद आणि पुनर्प्राप्तीशी संबंधित ज्ञान, कौशल्य आणि संसाधने एकमेकां सोबत शेअर करून आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी.
त्सुनामी म्हणजे काय ?
• “त्सुनामी” या शब्द जपानी शब्द “त्सू” म्हणजे बंदर आणि “नामी” म्हणजे लाट या शब्दांपासून बनला आहे.
• समुद्राच्या तळाशी झालेला भूकंप अथवा समुद्राच्या सपाटीखालील भागात झालेला ज्वालामुखीचा उद्रेक यांमुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात ऊर्जा मुक्त होते.
• या ऊर्जेमुळे भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून समुद्राच्या पाण्याच्या वर्तुळाकार तरंगाच्या स्वरूपात प्रचंड मोठ्या आकाराच्या लाटा तयार होतात.
• या अवाढव्य आकाराच्या लाटा ज्यावेळी समुद्रकिनाऱ्यावर येऊन धडकतात, त्या घटनेला त्सुनामी असे म्हटले जाते.
• 2004 साली हिंदी महासागरातील त्सुनामी आणि 2011 ची जपानमधील तोहोकू त्सुनामी यांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली होती.
जागतिक त्सुनामी जनजागृती दिन 2025 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
• “त्सुनामीसाठी तयार रहा : त्सुनामी प्रतिबंध व तयारीत गुंतवणूक करा” ही यंदाची थीम आहे.
• (Be Tsunami Ready : Invest in Tsunami Preparedness)
• ही संकल्पना त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून बचावासाठी पूर्वतयारी, गुंतवणूक आणि समुदाय प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करते.















