
Current Affairs | भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सैन्यात मानद रॅंक | Neeraj Chopra has been conferred the Honorary rank in the Territorial Army | चालू घडामोडी

भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सैन्यात मानद रॅंक
Neeraj Chopra has been conferred the Honorary Rank in the Territorial Army
Subject : GS
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सैन्यात खालील पैकी कोणत्या मानद पदकाने सन्मानित करण्यात आले ?
1. कॅप्टन
2. लेफ्टनंट कर्नल
3. लेफ्टनंट जनरल
4. मेजर जनरल
उत्तर : लेफ्टनंट कर्नल (Lieutenant Colonel)
बातमी काय ?
• 22 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथे झालेल्या समारंभात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सैन्यात (Territorial Army) लेफ्टनंट कर्नल (Lieutenant Colonel) या मानद पदकाचे तेजस्वी चिन्ह औपचारिकरित्या प्रदान केले.
मानद पद म्हणजे काय ?
• हे पद प्रादेशिक सैन्य नियमावली, 1948 च्या कलम 31 अंतर्गत प्रदान केले जाते.
• हे पद राष्ट्राला सन्मान मिळवून देणाऱ्या प्रतिष्ठित नागरिकांना प्रदान केले जाते.
• या पदाने सन्मानित झालेले लोक प्रतिकात्मक लष्करी कार्यक्रम आणि परेडमध्ये सहभागी होऊ शकतात.
• दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेते नीरज चोप्रा यांना राष्ट्रासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदान आणि कामगिरीबद्दल प्रादेशिक सैन्यात मानद लेफ्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आली आहे.
नीरज चोप्रा बद्दल परीक्षेसाठी महत्त्वाची माहिती :
• नीरज चोप्रा हा भारताचा पहिला ओलिंपिक सुवर्णपदक विजेता भाला फेकपटू आहे.
• टोकियो ऑलिंपिक 2020 (2021 मध्ये आयोजित) मध्ये त्याने 87.58 मीटरच्या थ्रोसह सुवर्णपदक जिंकले.
• वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 – रौप्यपदक जिंकले.
• वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023, बुडापेस्ट – नीरज चोप्रा हा सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.
• त्यांनी आशियाई खेळ (2018) आणि राष्ट्रकुल खेळ (2018) मध्येही सुवर्णपदके मिळवली आहेत.
• नीरज चोप्रा यांना भारतीय सैन्यात लेफ्टिनेंट कर्नल ही मानद रॅंक देण्यात आली.
• नीरज चोप्रा यांचे मूळ गाव हरियाणा राज्यातील खांडरा आहे.
• भारत सरकारने पद्मश्री, खेळ रत्न आणि अर्जुन पुरस्काराने नीरज चोप्रा यांना गौरविले आहे.
राष्ट्रीय भालाफेक दिन केव्हा असतो ?
राष्ट्रीय भालाफेक दिन कोणत्या घटनेच्या सन्मानार्थ आणि केव्हा पासुन साजरा केला जातो ?
• नीरज चोप्रा यांनी 7 ऑगस्ट 2021 रोजी टोकियो ओलंपिक मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकाविले होते.
• नीरज चोप्राचे हे सुवर्णपदक भारतीय ऑलिंपिक इतिहासातील ॲथलेटिक्स या प्रकारातील पहिले सुवर्णपदक आहे.
• या कामगिरीचे महत्त्व लक्षात घेऊन ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने (AFI) 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

नीरज चोप्रा क्लासिक 2025 स्पर्धे बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय भाला फेक स्पर्धा म्हणून “नीरज चोप्रा क्लासिक” या आंतरराष्ट्रीय भाला फेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
• बेंगळुरू येथील श्री कांतीरवा स्टेडियममध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
• या स्पर्धेला जागतिक मान्यता देत ही स्पर्धा World Athletics Gold-level Series मध्ये समाविष्ट करण्यात आली.
• या स्पर्धेचे उद्दिष्ट भारतात ट्रॅक व फील्ड खेळांना चालना देणे हे आहे.
• नीरज चोप्राच्या नावाने आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित होणे हा भारतीय ऍथलेटिक्ससाठी गौरवाचा क्षण मानला जातो.
“नीरज चोप्रा क्लासिक” 2025 या स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकाविले ?
• भारताच्या नीरज चोप्राने 86.18 मीटरच्या विजयी थ्रोसह या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीचे विजेतेपद पटकावले.





















