
चालू घडामोडी | स्पीड पोस्ट डिलिव्हरी गॅरंटी योजना | Speed Post Delivery Guarantee Scheme

स्पीड पोस्ट डिलिव्हरी गॅरंटी योजना
Speed Post Delivery Guarantee Scheme
Subject : GS - सरकारी योजना (Government Schemes)
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान/विधाने असलेला पर्याय निवडा.
अ) स्पीड पोस्ट डिलिव्हरी गॅरंटी योजना जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे.
ब) या योजनेचा उद्देश डाक विभागाच्या सेवांना खाजगी कुरिअरप्रमाणे वेगवान आणि विश्वासार्ह बनवणे हे आहे.
पर्याय :
1. फक्त अ विधान योग्य
2. फक्त ब विधान योग्य
3. अ आणि ब दोन्ही विधाने योग्य
4. अ आणि ब दोन्ही विधाने अयोग्य
उत्तर : अ आणि ब दोन्ही विधाने योग्य
बातमी काय ?
• केंद्रीय दूरसंवाद आणि ईशान्य भारत क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया (Shri Jyotiraditya M. Scindia) यांनी नुकतीच घोषणा केली की, स्पीड पोस्टची नवी, 24-48 तास गॅरंटीड डिलिव्हरी सेवा जानेवारी 2026 पासून सुरू केली जाईल.

स्पीड पोस्ट म्हणजे काय ?
What is Speed Post ?
• स्पीड पोस्ट ही भारतीय डाक विभाग (India Post) यांची प्रीमियम पोस्टल सेवा आहे. जी जलद व सुरक्षित पार्सल डिलिव्हरी साठी प्रसिद्ध आहे.
• लॅान्च : स्पीड पोस्ट ची सुरुवात 1986 मध्ये करण्यात आली.
• उद्देश : खाजगी कुरिअर कंपन्यांसारखी सरकारी पोस्टल ची जलद सेवा देणे. हे स्पीड पोस्ट चे उद्दिष्ट आहे.
• सिद्धांत : स्पीड पोस्ट योजनेचा उद्देश “One India, One Rate” असून संपूर्ण देशात समान दराने पार्सल पाठविण्याची सुविधा याद्वारे उपलब्ध केली जाते.
स्पीड पोस्ट चे काम कसे चालते ?
• ग्राहक पोस्ट ऑफिस काउंटरवर किंवा ऑनलाइन पोर्टलवर पार्सल बुक करतो.
• प्रत्येक पार्सलला युनिक ट्रॅकिंग नंबर दिला जातो.
• पार्सल एअर आणि रोड नेटवर्क द्वारे देशभर पाठवले जाते.
• ग्राहक www.indiapost.gov.in किंवा India Post App वरून ट्रॅकिंग करू शकतो.
स्पीड पोस्ट डिलिव्हरी गॅरंटी योजना का सुरू करण्यात आली ?
स्पीड पोस्ट डिलिव्हरी गॅरंटी योजनेचा उद्देश कोणता ?
• स्पीड पोस्ट सेवेला वेग आणि विश्वासार्हतेच्या नव्या स्तरावर नेणे.
• 24-48 तासात गॅरंटीड डिलिव्हरी देऊन ग्राहकांचा विश्वास वाढवणे.
• डिलिव्हरी वेळेत न झाल्यास मुआवजा (Compensation) देऊन उत्तरदायित्व (Accountability) निर्माण करणे.
• खाजगी कुरिअर कंपन्यांशी स्पर्धात्मक कार्यक्षमता राखणे.
स्पीड पोस्ट डिलिव्हरी गॅरंटी योजनेचे फायदे कसे होतील ?
Benefits of the Speed Post Delivery Guarantee Scheme :
• ग्राहकांना जलद आणि निश्चित डिलिव्हरीची सुविधा मिळेल.
• ई-कॉमर्स आणि व्यवसाय क्षेत्राला लाभ होईल.
• ग्रामीण आणि दुर्गम भागात दळणवळण मजबूत होईल.
• सरकारी पोस्टल सेवांवरील विश्वास वाढेल.
• तर एकंदरीत स्पीड पोस्ट डिलिव्हरी गॅरंटी योजना ही भारतीय डाक विभागाची ऐतिहासिक पायरी ठरणार आहे, जी देशातील पोस्टल सेवांना “गती आणि विश्वसनीयता” या नव्या युगात घेऊन जाईल.
भारतीय डाक विभागाच्या स्पीड पोस्ट चा इतिहास :
Timeline of Speed Post of India Postal Department :
• 1986 : भारत सरकारने स्पीड पोस्ट सेवा सुरू केली.
• 1990 चे दशक : देशभरातील जवळजवळ सर्व प्रमुख शहरे आणि जिल्हा मुख्यालयांमध्ये स्पीड पोस्ट सेवा उपलब्ध झाली.
• 2000 चे दशक : ट्रॅकिंग सिस्टम आणि बारकोड-आधारित मॉनिटरिंग सुरू करण्यात आले.
• 2010 नंतर : ऑनलाइन बुकिंग, ट्रॅकिंग आणि पेमेंट सुविधा जोडण्यात आल्या.
• 2026 : स्पीड पोस्ट ही सेवा आता गॅरंटीड डिलिव्हरी मॉडेलमध्ये सुरू करण्यात येईल.
भारतीय डाक विभागाचे कव्हरेज क्षेत्र :
• देशातील 1.5 लाखांहून अधिक पोस्ट ऑफिसांमधून ही सेवा उपलब्ध आहे.
• जवळपास प्रत्येक जिल्हा, गाव आणि तालुका पर्यंत पोहोच.
• आंतरराष्ट्रीय सेवेत 136 पेक्षा अधिक देशांपर्यंत भारतीय पोस्ट ल सेवा उपलब्ध आहे.























