
चालू घडामोडी 08, जुलै 2025 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च पुरस्कार | PM Modi Conferred Trinidad & Tobago’s Highest National Award

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च पुरस्कार
PM Modi Conferred Trinidad & Tobago’s Highest National Award
Subject : GS - पुरस्कार, आंतरराष्ट्रीय घडामोडी
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर हा देश खालील पैकी कोणत्या समुद्रात वसलेला आहे ?
1. कॅरिबियन समुद्र
2. हिंदी महासागर
3. तांबडा समुद्र
4. अरबी समुद्र
उत्तर : कॅरिबियन समुद्र
पुरस्कारा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• अलिकडेच, त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार - "द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो" (The Order of the Republic of Trinidad & Tobago) या पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी, हा पुरस्कार मिळवणारे पहिले परदेशी नेते आहेत.
• पोर्ट ऑफ स्पेन येथील राष्ट्रपती भवनात त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या राष्ट्रपती क्रिस्टीन कार्ला कांगालू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा सन्मान प्रदान केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार का देण्यात आला ?
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचे राजकीय कौशल्य,
• ग्लोबल साउथच्या प्राधान्यक्रमांना महत्वाचे स्थान देणे, आणि
• भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी दिलेल्या अपवादात्मक योगदानाबद्दल "द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो" हा पुरस्कार देण्यात आला.
त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• स्थान : त्रिनिदाद आणि टोबॅगो, कॅरिबियन समुद्रातील एक बेट राष्ट्र आहे.
• हा देश त्रिनिदाद आणि टोबॅगो या दोन मुख्य बेटांनी बनलेला आहे.
• हे दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळ वसलेले आहे.
• राजधानी : पोर्ट ऑफ स्पेन (Port of Spain)
• स्वातंत्र्य : त्रिनिदाद आणि टोबॅगोने 1962 मध्ये युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळवले.
• भारताशी संबंध : भारत आणि त्रिनिदाद यांचे ऐतिहासिक संबंध 1845 पासून आहेत, जेव्हा भारतीय करारबद्ध कामगार तेथे आले.
• त्रिनिदादच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 37% लोक भारतीय वंशाचे आहेत.