
चालू घडामोडी 07, जुलै 2025 | सुकन्या सोनोवाल यांची नियुक्ती | Sukanaya Sonowal selected as ...

सुकन्या सोनोवाल यांची नियुक्ती
Sukanaya Sonowal selected as ...
Subject : GS - नियुक्ती, आंतरराष्ट्रीय घडामोडी, जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) सुकन्या सोनोवाल यांना कोणत्या नेटवर्कच्या कार्यकारी समितीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे ?
1. संयुक्त राष्ट्र युवा मंच
2. सार्क युथ नेटवर्क
3. ब्रिक्स युथ नेटवर्क
4. कॉमनवेल्थ युथ पीस ॲम्बेसेडर नेटवर्क
उत्तर : कॉमनवेल्थ युथ पीस ॲम्बेसेडर नेटवर्क
सुकन्या सोनोवाल यांबद्दल थोडक्यात माहिती :
• आसामच्या सुकन्या सोनोवाल (Sukanya Sonowal) यांचा कॉमनवेल्थ युथ पीस ॲम्बेसेडर्स नेटवर्क (CYPAN) च्या कार्यकारी समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
• 2025 ते 2027 या कालावधीसाठी सुकन्या सोनोवाल यांना कम्युनिकेशन्स आणि जनसंपर्क (Communications & Public Relations) प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
• सुकन्या सोनोवाल या IIT गुवाहाटी येथे चौथ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे.
• सुकन्या सोनोवाल बायोसायन्सेस आणि बायोइंजिनिअरिंगमध्ये बी.टेक.चे शिक्षण घेत आहे.

कॉमनवेल्थ युथ पीस अॅम्बेसेडर नेटवर्क बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• CYPAN चा फूल फॅार्म Commonwealth Youth Peace Ambassadors Network
• कॉमनवेल्थ युथ पीस अॅम्बेसेडर नेटवर्क (CYPAN) हे राष्ट्रकुल देशांच्या तरूण संघटनेचा एक भाग आहे.
CYPAN चे उद्दिष्ट कोणते ?
• शांतता, आदर आणि समजूतदारपणा वाढविण्यासाठी आणि हिंसक अतिरेकीपणा रोखण्यासाठी राष्ट्रकुलमधील तरुणांना एकत्र आणणे.
• शांतता आणि हिंसक अतिरेकीपणाचा सामना करण्याशी संबंधित धोरणात्मक समर्थनासाठी व्यासपीठ निर्माण करणे. हे कॉमनवेल्थ युथ पीस अॅम्बेसेडर नेटवर्कचे उदिष्ट आहे.
राष्ट्रकुल म्हणजे काय ?
• ग्रेट ब्रिटन आणि एके काळी ब्रिटिश साम्राज्यात मोडणाऱ्या पण नंतर स्वतंत्र झालेल्या काही देशांची राष्ट्रकुल ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे.
• ब्रिटिश साम्राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय गरजेतून एक शतकापूर्वी वसाहतींच्या परिषदेच्या (कलोनियन कॉन्फरन्सच्या) रूपात राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) या संस्थेचा उदय झाला.
• राष्ट्रकुल प्रमुख (Head of the Commonwealth) : ब्रिटिश सम्राट (British Monarch) हे राष्ट्रकुल प्रमुख आहे.
राष्ट्रकुल राष्ट्रसंघाचे सदस्य देश किती आहेत ?
How many countries are members of the Commonwealth of Nations ?
• सदस्य देश : राष्ट्रकुल ही आशिया, आफ्रिका, युरोप आणि पॅसिफिक क्षेत्रातील 56 स्वतंत्र देशांची संघटना आहे.
• पूर्वी, एकेकाळी ब्रिटीश वसाहती असलेले देश कॉमनवेल्थचे सदस्य होते.
• पण मोझांबिक, रवांडा, गॅबॉन आणि टोगो हे चार देश ब्रिटनची वसाहत न होता कॉमनवेल्थचे सदस्य झाले आहेत.
• भारत राष्ट्रकुल (Common Wealth) चा सदस्य देश आहे.
राष्ट्रकुल राष्ट्रांचे सचिवालय कोठे आहे ?
Where is the secretariat of the Commonwealth of Nations located ?
• राष्ट्रकुल राष्ट्रांचे सचिवालय लंडन शहरातील मार्लबोरो हाऊस (Marlborough House) येथे आहे