
चालू घडामोडी 04, जुलै 2025 | क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक | Quad Foreign Ministers’ Meeting

क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक
Quad Foreign Ministers’ Meeting
Subject : GS - जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकी संदर्भात योग्य विधान/विधाने असलेला पर्याय निवडा.
अ) क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची 10 वी बैठक भारतात पार पडली.
ब) भारताकडून डॉ. एस. जयशंकर या बैठकीला उपस्थित होते.
पर्याय :
1. फक्त अ बरोबर
2. फक्त ब बरोबर
3. अ आणि ब दोन्ही बरोबर
4. अ आणि ब दोन्ही चूक
उत्तर : फक्त ब बरोबर
• विधान अ) चूकीचे आहे कारण
• क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची 10 वी बैठक अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी (Washington D.C.) येथे पार पडली.
बातमी काय ?
• क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नुकतीच वॉशिंग्टन डीसी येथे झाली.
10 व्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकी संदर्भात परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• 1 जुलै 2025 रोजी अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी (Washington D.C.) येथे 10 वी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली.
• भारताकडून परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर या बैठकीला उपस्थित होते.
• या दौऱ्याचा मुख्य उद्देश क्वाड ग्रुपच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणे आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये दहशतवादामुळे कसे प्रदेशाचं नुकसान होतेय याची जाणीव करून देणे आहे.
• चर्चेचे विषय : प्रादेशिक सुरक्षा, दहशतवादविरोधी सहकार्य आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात स्थिरता यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
10 व्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत कोण- कोण उपस्थित होते ?
• भारत : परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर
• अमेरिका : परराष्ट्र सचिव मार्को रुबियो
• जपान : परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया
• ऑस्ट्रेलिया : परराष्ट्र मंत्री पेनी वोंग
10 व्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत प्रमुख मुद्दे :
• या परीक्षदेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताचा दृष्टिकोन मांडला तो पुढीलप्रमाणे :
दहशतवादावर शून्य सहिष्णुता :
• परराष्ट्र मंत्री म्हणाले की जगाने दहशतवादाबद्दल शून्य सहिष्णुता दाखवली पाहिजे.
• दहशतवादाचे बळी आणि गुन्हेगारांना कधीही समान वागणूक दिली जाऊ नये.
भारताचा स्वसंरक्षणाचा अधिकार :
• भारताला आपल्या लोकांना दहशतवादापासून वाचवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि आम्ही हा अधिकार वापरू.
• भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाई केली आहे, जी अचूक होती आणि योग्य होती.
क्वॉडकडून अपेक्षा :
• परराष्ट्र मंत्र्यांनी क्वाड भागीदारांना भारताची दहशतवादविरोधी भूमिका समजून घेण्याचे आणि पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
"दहशतवादाची मानवी किंमत" प्रदर्शनाचे उद्घाटन :
• डॉ. एस जयशंकर यांनी "दहशतवादाची मानवी किंमत" (The Human Cost of Terrorism) यावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
• हे प्रदर्शन जगभरातील दहशतवादी हल्ल्यांचे सामाजिक, आर्थिक आणि मानसिक परिणाम अधोरेखित करते.
• सीमापार दहशतवाद विशेषतः पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवाद याविरुद्ध जागतिक समर्थन मिळविण्यासाठी भारताने घेतलेले हे एक धोरणात्मक पाऊल मानले जाते.
क्वाड (Quad) म्हणजे नेमकं काय ?
• क्वाड चा फूल फॅार्म 'क्वॉड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग' (Quadrilateral Security Dialogue) असा आहे.
• क्वाड हे 4 देशांचा समावेश असलेला एक धोरणात्मक मंच आहे.
• क्वाड मध्ये भारत, संयुक्त अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा समावेश आहे.
• 2007 मध्ये, तत्कालीन जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी या युतीला क्वाड संघटना असे नाव दिले.
• उद्दिष्ट्ये : क्वाड चे प्राथमिक उद्दिष्टांमध्ये सागरी सुरक्षा, हवामान बदलाच्या जोखमींना तोंड देणे, प्रदेशात गुंतवणुकीसाठी परिसंस्था (इकोसिस्टम) तयार करणे आणि तांत्रिक नवकल्पनांना चालना देणे यांचा समावेश आहे.