
चालू घडामोडी 01, जुलै 2025 | Operation Bihali | ऑपरेशन बिहाली

Operation Bihali
ऑपरेशन बिहाली
Subject : GS - संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये चर्चेत असलेले ऑपरेशन बिहाली हे खालील पैकी कशाशी संबंधित आहे ?
1. युद्ध सराव
2. दहशतवादविरोधी मोहीम
3. सायबर गुन्ह्यांविरोधी मोहीम
4. मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण मोहीम
उत्तर : दहशतवादविरोधी मोहीम (Counter-Terror Operation)
बातमी काय ?
• जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात ऑपरेशन बिहाली दरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले.
ऑपरेशन बिहाली काय आहे ?
• ऑपरेशन बिहाली ही जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेली एक दहशतवादविरोधी मोहीम (Counter-Terror Operation) आहे.
• उधमपूरच्या बसंतगड भागात कार्यरत असलेल्या पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammad) दहशतवाद्यांना निष्क्रिय करण्यासाठी ऑपरेशन बिहाली ही दहशतवादविरोधी मोहीम सुरू करण्यात आली.
ऑपरेशन बिहाली कोणी लॅान्च केली ?
• ऑपरेशन बिहाली ही भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांची संयुक्त लष्करी कारवाई आहे.
• व्हाईट नाईट कॉर्प्सच्या (White Knight Corps) ऑपरेशनल कमांड अंतर्गत भारतीय लष्कराच्या पॅरा कमांडो आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे हे ऑपरेशन केले.
ऑपरेशन बिहाली चा उद्देश कोणता ?
• गेल्या एक वर्षापासून पाळत ठेवून असलेल्या जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammad) च्या चार दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली.
• 12 महिन्यांच्या देखरेखीखाली ओळखल्या गेलेल्या 4 जैश-ए-मोहम्मद दहशतवाद्यांना रोखणे आणि त्यांचा खात्मा करणे, ज्यामुळे सीमेपलीकडून होणारे संभाव्य दहशतवादी हल्ले टाळता येतील. हे या ऑपरेशनचे उद्दिष्ट आहे.













