
चालू घडामोडी 03, जुलै 2025 | ऑपरेशन चक्र-V | Operation Chakra V

ऑपरेशन चक्र-V
Operation Chakra V
Subject : GS - संरक्षण - सायबर सिक्युरिटी
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) सायबर गुन्हे आणि डिजिटल अटके विरूद्ध ऑपरेशन चक्र-V कोणत्या एजन्सीद्वारे चालवले जाते ?
1. ED
2. CBI
3. IB
4. NIA
उत्तर : CBI (Central Bureau of Investigation)
ऑपरेशन चक्र-V बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) ऑपरेशन चक्र-V अंतर्गत सायबर फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणांशी संबंधित काही बँक खाती उघडकीस आणली आहेत.
• ही कारवाई राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आली.
• CBI च्या म्हणण्यानुसार, सायबर गुन्हे आणि डिजिटल अटकेद्वारे गुन्हेगारांनी बळकावलेले पैसे लाँडर करण्यासाठी देशभरातील विविध बँकांमध्ये सुमारे 8.5 लाख म्युल बॅंक अकाउंट उघडण्यात आले आहेत.
ऑपरेशन चक्र-V म्हणजे काय ? ते कोणी सुरू केलं ?
• CBI ने आंतरराष्ट्रीय संघटित सायबर गुन्हे/डिजिटल अटकेविरुद्ध (Digital Arrest) ऑपरेशन चक्र-V सुरू केले.
• ऑपरेशन चक्र-V हे भारतातील सायबर गुन्हेगारी आणि डिजिटल अटकेसारख्या सायबर गुन्ह्यांना सक्षम करणाऱ्या व्यापक पायाभूत सुविधा ओळखण्यावर आणि नष्ट करण्यावर लक्ष केंद्रित करते.
म्युल खाती म्हणजे काय ?
What are Mule Bank Accounts ?
• म्युल खाती म्हणजे अशी बँक खाती ज्यांचा वापर गुन्हेगारांकडून बेकायदेशीर पद्धतीने पैसा (निधी) प्राप्त करण्यासाठी आणि वेगवेगळ्या अकाउंट मध्ये हस्तांतरित करण्यासाठी केला जातो.
• म्युल बॅंक खाती ही गुन्हेगारी संस्था आणि बेकायदा निधी यांच्यातील मध्यस्थ म्हणून काम करते.
• ही खाती सामान्यत: अशा व्यक्तींद्वारे उघडली जातात ज्यांना एकतर सहज पैसे देण्याचे आश्वासन देऊन फसवले जाते किंवा अशा व्यक्तींना सहभागी होण्यासाठी दबाव आणला जातो.
• नंतर त्यांच्या बँक खात्याचा वापर मनी लॉन्ड्रींग, बेकायदेशीर सट्टेबाजी, दुसऱ्या देशात व्यापार, कर चोरी
यांसारख्या बेकायदेशीर गोष्टींसाठी केला जातो.
• अशा प्रकारच्या फसवणुकीत ठग संभाव्य पीडितांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांची बँक खाती किंवा क्रेडिट कार्ड प्रदान करण्यासाठी किंवा त्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्याचे आमिष दाखवून सोशल मीडिया, चॅट रूम, ईमेल आणि इतर चॅनेल वापरतात.
• अशा बळी ठरलेली व्यक्तींना "मनी म्यूल" म्हणून संबोधले जाते.
• पोलीस तपासात ज्यांच्या बँक अकाउंट चा वापर झाला आहे अशी मनी म्यूल लोकं लक्ष्य ठरतात आणि संबंधित गुन्हेगार सापडत नाहीत.