
चालू घडामोडी 01, जुलै 2025 | राष्ट्रीय डॉक्टर दिन | National Doctor’s Day

राष्ट्रीय डॉक्टर दिन
National Doctor’s Day
💐 राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 👩⚕️🩺
Subject : GS - दिनविशेष, व्यक्ती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) देशभरात दरवर्षी राष्ट्रीय डॉक्टर दिन केव्हा साजरी करण्यात येतो ?
1. 1 मे
2. 27 जून
3. 1 जुलै
4. 7 जुलै
उत्तर : 1 जुलै
राष्ट्रीय डॉक्टर दिन कोणाच्या सन्मानार्थ साजरी करतात ?
• देशातील सर्वात प्रसिद्ध डॉक्टरांपैकी एक असलेले डॉ. बिधान चंद्र रॉय (Dr. Bidhan Chandra Roy) यांच्या सन्मानार्थ 1 जुलै रोजी संपूर्ण भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो.
• 1 जुलै हा दिवस डॉ. बिधान चंद्र रॉय यांचा जन्मदिवस आणि मृत्यू दिन आहे.

पहिला राष्ट्रीय डॉक्टर दिन कोणाच्या वर्षी साजरी करण्यात आला ?
• डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने 1991 मध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिनाची अधिकृतपणे स्थापना केली.
• 1 जुलै 1991 मध्ये पहिला राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला.
डॉ. बिधान चंद्र रॉय यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• डॉ. बिधान चंद्र रॉय हे प्रसिद्ध डॉक्टर तर होतेच पण त्याचबरोबर ते एक दूरदर्शी नेते देखील होते.
• डॉ. बी.सी. रॉय हे डॉक्टर, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी होते.
• डॉ. बिधान चंद्र रॉय यांनी भारताच्या आरोग्यसेवेच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.
• त्यांच्या योगदानामुळे वैद्यकीय संस्थांची निर्मिती, चांगले वैद्यकीय प्रशासन आणि सर्वांसाठी सुलभ आरोग्यसेवा निर्माण झाली.
• डॉ. बी.सी. रॉय यांनी इंडियन मेडिकल कौन्सिल आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली.
जन्म :
• डॉ. बी.सी. रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 मध्ये ब्रिटिश भारतातील बंगाल प्रेसीडेंसीच्या बाँकीपूर गावामध्ये झाला.
स्वातंत्र्यसैनिक :
• त्यांनी 1930 मध्ये बंगालमध्ये सुरू झालेल्या सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व देखील केले.
मुख्यमंत्री :
• पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री म्हणूनही निवडून आले.
• 23 जानेवारी 1948 पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी 14 वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री पद भूषवले.
• डॉ. बिधान चंद्र रॉय यांना आधुनिक पश्चिम बंगालचे शिल्पकार मानले जाते.
मृत्यू :
• 1 जुलै 1962 रोजी वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
पुरस्कार आणि सन्मान :
• 1961 रोजी डॉ. बिधान चंद्र रॉय यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
• 1976 मध्ये डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ बी.सी. रॉय राष्ट्रीय पुरस्काराची स्थापना करण्यात आली.
• वैद्यकीय, राजकारण, विज्ञान, तत्वज्ञान, साहित्य आणि कला या क्षेत्रातील कार्यासाठी बी.सी. रॉय राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो.
2025 या वर्षीच्या "राष्ट्रीय डॉक्टर दिनाची" संकल्पना थीम कोणती ?
• 2025 या वर्षीच्या राष्ट्रीय डॉक्टर दिनाची थीम 'मुखवटाच्या मागे: बरे करणाऱ्यांना कोण बरे करते ?' ही आहे.
• 2025 Theme : “Behind the Mask: Who Heals the Healers?”