
चालू घडामोडी 02, जुलै 2025 | जागतिक UFO दिन | World UFO Day

जागतिक UFO दिन
World UFO Day
Subject : GS - दिनविशेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक UFO (अज्ञात उडती वस्तू) दिन केव्हा साजरा केला जातो ?
1. 30 जून
2. 2 जुलै
3. 9 जुलै
4. 9 ॲागस्ट
उत्तर : 2 जुलै
बातमी काय ?
• दरवर्षी 2 जुलै रोजी जागतिक UFO दिन साजरा केला जातो.
UFO म्हणजे काय ?
• UFO चा फूल फॅार्म Unidentified Flying Object असा आहे.
• UFO ला “अज्ञात उडती वस्तू” किंवा सामान्य भाषेत “उडती तबकडी” असेही म्हटले जाते.
• UFO म्हणजेच अशी उडणारी वस्तू जिचे स्वरूप, कार्य किंवा मूळ क्षणभर ओळखता येत नाही.
• वैज्ञानिक दृष्टिकोनातून, "UFO" म्हणजे अशी कोणतीही वस्तू जी आकाशात दिसते परंतु ओळखता येत नाही.
जागतिक UFO दिन का साजरी करतात ?
• संपूर्ण विश्वात पृथ्वीसारखे अनेक ग्रह-उपग्रह आहेत.
• या ग्रहांवर कोणी राहत असेल का ?
• एलियन खरेच आहेत का ?
• एलियन कसे दिसत असतील ?
• अवकाशात काही विचित्र वस्तू उडत असल्याच्या घटना, त्या वस्तू नेमक्या काय आहे ?
• यांसारखे अनेक प्रश्न पडतात. यासाठी शास्त्रज्ञांचे यावर शोधकार्य देखील सुरू आहे.
• 2 जुलै हा दिवस अंतराळ, एलियनस आणि अज्ञात उडणाऱ्या वस्तूंबाबत (Unidentified Flying Object – UFO) लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि चर्चेला चालना देण्यासाठी साजरा केला जातो.
• या दिवसाचा उद्देश म्हणजे लोकांमध्ये UFO (अज्ञात उडणाऱ्या वस्तू) च्या अस्तित्वाबद्दल जागरूकता पसरवणे, मोकळ्या मनाच्या वैज्ञानिक विचारांना प्रोत्साहन देणे आणि विविध देशांच्या सरकारांना त्यांच्याशी संबंधित माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करणे हा आहे.
जागतिक UFO दिनाची सुरुवात कोणी आणि केव्हा केली ?
• जागतिक UFO दिनाची सुरुवात 2001 मध्ये UFO संशोधक हक्तान अकडोगन (Haktan Akdogan) यांनी केली होती.
• 2 जुलै ही तारीख एका विशेष कारणासाठी निवडण्यात आली होती;
• 2 जुलै 1947 रोजी अमेरिकेतील न्यू मेक्सिकोमधील रोसवेल येथे एक रहस्यमय UFO अपघात झाला.
• जो UFO इतिहासातील सर्वात चर्चेत असलेल्या घटनांपैकी एक मानला जातो.

काय आहे रोसवेल घटना ?
What is the Roswell Incident ?
• 2 जुलै 1947 रोजी, अमेरिकन हवाई दलाने "उडणारी तबकडी" (Flying Saucer) सापडल्याचा दावा केला.
• परंतु काही वेळातच त्यांनी त्यांचे विधान बदलले आणि ते फक्त हवामानाचा फुगा असल्याचे सांगितले.
• या विरोधाभासामुळे लोकांना संशय आला आणि येथूनच UFO, एलियन आणि गुप्त सरकारी प्रकल्पांबद्दल अनेक सिद्धांत सुरू झाले.
• रोसवेल घटना जागतिक UFO दिनाची प्रेरणा मानली जाते.
