
चालू घडामोडी 02, जुलै 2025 | महाराष्ट्र सरकारने लॅान्च केले ‘हेजिंग डेस्क’ | Maharashtra Govt Launches Hedging Desk

महाराष्ट्र सरकारने लॅान्च केले ‘हेजिंग डेस्क’
Maharashtra Govt Launches Hedging Desk
Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम, कृषी
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच महाराष्ट्र सरकारने पहिले ‘हेजिंग डेस्क’ कोठे सुरू केले ?
1. पुणे
2. सातारा
3. नाशिक
4. नागपूर
उत्तर : पुणे
बातमी काय ?
• महाराष्ट्र सरकारने पुण्यात ‘हेजिंग डेस्क’ सुरू केले.
हेजिंग डेस्क बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• कृषी उत्पादकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि किमतीच्या जोखमीपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुण्यात ‘हेजिंग डेस्क’ सुरू केले आहे.
• मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART) या प्रकल्पांतर्गत हे हेजिंग डेस्क स्थापन करण्यात आले आहे.
• शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारमूल्य मिळावे यासाठी, महाराष्ट्र सरकारने ‘हेजिंग डेस्क’ सुरू केला आहे.
• या योजनेच्या पहिल्या टप्प्या अंतर्गत पुणे येथे ‘हेजिंग डेस्क’ सुरू करण्यात आला.
‘हेजिंग डेस्क’ साठी सुरुवातीच्या टप्प्यात कोणती पिके निवडली गेली ?
• सुरूवातीला कापूस, हळद आणि मका (Cotton, Turmeric, and Maize) या पिकांसाठी ‘हेजिंग डेस्क’ सुरू केला आहे.
• टप्प्या-टप्प्याने इतर पिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
‘हेजिंग डेस्क’ (Hedging Desk) म्हणजे काय ?
• ‘हेज’ या शब्दाचा अर्थ बाहेरून येणाऱ्या संकटांपासून संरक्षण देण्यासाठी, त्यांना अटकाव करण्यासाठी बांधलेले साधन होय.
• उदाहरणार्थ : पिक संरक्षणासाठी शेताला जसे कुंपण असते.
• त्याचप्रमाणे शेत मालाच्या किंमतीच्या चढ-उतारातून निर्माण होणाऱ्या संकटापासून संरक्षण देणारे जे साधन म्हणजे च जे कुंपण असते त्याला ‘हेजिंग’ म्हणतात.
• यासाठी शेतकऱ्यांना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठीचे जी व्यासपीठ आहे त्यास ‘हेजिंग डेस्क’ (Hedging Desk) असे म्हणतात.
• या उपक्रमामुळे शेतकरी त्यांच्या उत्पादनांच्या भविष्यातील किंमतीतील चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळू शकतात.
हेजिंग डेस्कची वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे कोणती ?
• जागतिक बँकेच्या शिफारशीवरून हेजिंग डेस्कची स्थापना करण्यात आली आहे.
• सेबी’चे (SEBI) नियंत्रण असलेल्या नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज (NCDEX) संस्थेच्या कमोडिटी मार्केट्स आणि संशोधन संस्थेने (NICR) या प्रकल्पासाठी सहकार्य केले आहे.
• भविष्यकाळातील कमी होणाऱ्या किंमतींपासून निर्माण होणारी जोखीम कमी करणे हा ‘हेजिंग’ चा मुख्य उद्देश आहे.
• त्याचबरोबर भविष्यकाळातील वाढणाऱ्या किंमतीचा फायदा घेण्यासाठी ऑप्शन ट्रेडिंगचा वापर केला जाऊ शकतो.
शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन :
• 3 हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना हेजिंग साधने आणि धोरणांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
• बाजार ट्रेंड, पुरवठा-तारणातील बदल, जागतिक किमतींवर रिअल-टाइम मार्केट इंटेलिजन्सची माहिती देण्यात येंईल.
• शेतीजवळ साठवणूक केंद्रे उभारण्यासाठी शेतकऱ्यांना व शेतकरी उत्पादक संघटनांना (Farmer Producer Organisation - FPO) प्रोत्साहन दिले जाईल.