
चालू घडामोडी 02, जुलै 2025 | राधानाथ स्वामींचा आध्यात्मिक आणि सामुदायिक नेतृत्वासाठी सन्मान | Radhanath Swami Honoured for Spiritual and Community Leadership

राधानाथ स्वामींचा आध्यात्मिक आणि सामुदायिक नेतृत्वासाठी सन्मान
Radhanath Swami Honoured for Spiritual and Community Leadership
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अमेरिकेच्या कोणत्या शहराने राधानाथ स्वामींना आध्यात्मिक आणि सामुदायिक नेतृत्वासाठी सन्मानित केले ?
1. न्यूयॉर्क
2. वाशिंगटन डी.सी.
3. लॉस एंजेलेस
4. शिकागो
उत्तर : न्यूयॉर्क (New York )
न्यू यॉर्क सिटी सन्माना बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• जागतिक स्तरावर आदरणीय आध्यात्मिक गुरू आणि इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस (इस्कॉन) चे ज्येष्ठ भिक्षू राधानाथ स्वामी यांना न्यू यॉर्क सिटी सन्मानाने सन्मानित करण्यात आले.
• भक्ती केंद्रात आयोजित एका विशेष आंतरधर्मीय कार्यक्रमात राधानाथ स्वामी यांना न्यू यॉर्क सिटी हा सन्मान देण्यात आला.
• राधानाथ स्वामींना ही सन्मान महापौर एरिक अॅडम्स यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय व्यवहार उपायुक्त दिलीप चौहान यांच्या हस्ते देण्यात आला.
पुरस्कार देण्याचा उद्देश :
• आध्यात्मिक विकास, सामाजिक विस्तार आणि जागतिक सद्भावना वाढवण्यासाठी आयुष्यभर दिलेल्या योगदानाबद्दल राधानाथ स्वामींचा सन्मान करण्यासाठी
• तसेच न्यू यॉर्क आणि जगभरात आंतर-धार्मिक संवाद आणि सहकार्याला इस्कॉनच्या कार्याच्या योगदानाबद्दल न्यू यॉर्क सिटी सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आले.











