
चालू घडामोडी 03, जुलै 2025 | राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचे उद्घाटन | Inauguration of the National Turmeric Board Headquarters by Home Minister Amit Shah

राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचे उद्घाटन
Inauguration of the National Turmeric Board Headquarters
Subject : GS - सरकारी योजना- उपक्रम, भूगोल, अर्थशास्त्र - कृषी
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच, राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आले ?
1. नागपूर
2. सातारा
3. चेन्नई
4. निजामाबाद
उत्तर : निजामाबाद
राष्ट्रीय हळद मंडळा संदर्भात परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• अलिकडेच, केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांनी तेलंगणातील निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचे उद्घाटन केले.
• ज्याचा उद्देश हळदीसाठी पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग आणि निर्यात यासह संपूर्ण मूल्य साखळी विकसित करणे आहे.
• या स्थापनेमुळे, हळदीची लागवड करणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांची 40 वर्षांची जुनी मागणी पूर्ण झाली.
• निझामाबाद हे अनेक दशकांपासून हळदीची राजधानी म्हणून ओळखले जाते.
• येथील शेतकरी शतकानुशतके हळदीची लागवड करत आहेत.
राष्ट्रीय हळद मंडळाचे मुख्यालय कोठे आहे ?
• राष्ट्रीय हळद मंडळाचे मुख्यालय तेलंगणाच्या निजामाबाद येथे आहे.
राष्ट्रीय हळद मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण ?
• राष्ट्रीय हळद मंडळाचे पहिले अध्यक्ष पल्ले गंगा रेड्डी (Palle Ganga Reddy) असणार आहेत.

नव्याने स्थापन केलेल्या राष्ट्रीय हळद मंडळाचे महत्त्वाची भूमिका कोणती ?
राष्ट्रीय हळद मंडळ काय काम करेल ?
• नव्याने स्थापन झालेले मंडळ महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, मेघालय यासह 20 राज्यांमधील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे विशेष लक्ष देईल.
• हळद मंडळाच्या स्थापनेमुळे देशातील हळद उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ होईल.
• हळद उत्पादनांच्या संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देईल आणि परदेशात विपणनासाठी हळदीशी संबंधित उत्पादनांच्या मूल्यवर्धनाकडे लक्ष देईल.
• हळदीचे महत्वपूर्ण आणि वैद्यकीय गुणधर्म, त्याचे उत्पादन वाढवण्याच्या पद्धती आणि नवीन बाजारपेठांमध्ये व्यापाराला चालना देण्यासाठी लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळीला चालना देण्यासाठी जागरूकता निर्माण करेल.
हळदी बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• हळद ही वनस्पती झिंजिबरेसी कुळातील आहे.
• हळदीचे शास्त्रीय नाव कुर्कुमा लाँगा (Curcuma Longa) आहे.
• हळदीला 'गोल्डन स्पाइस' असेही म्हटले जाते.
• हळदीला पिवळा रंग करक्यूमिन (Curcumin) या घटकामुळे असतो.

हळदीचे गुणधर्म आणि वापर :
• हळद ही भारतीयांच्या जीवनातील एक अविभाज्य अंग असून धार्मिक समारंभात, पारंपरिक विधी, अन्न, सौंदर्यप्रसाधने, , औषधे, रंग इत्यादींकरिता ती वापरतात.
• हळदीचा वापर आयुर्वेद, पारंपारिक भारतीय वैद्यकीय प्रणाली आणि पूर्व आशियाई वैद्यकीय प्रणाली मध्ये खूप वर्षांपासून होत आहे.
हळदीचे वैद्यकीय गुणधर्म पुढीलप्रमाणे :
• एंटी-इंफ्लेमेटरी : जळजळ कमी करते.
• अँटिऑक्सिडेंट: शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवते.
• जंतुनाशक : जखमा भरण्यास मदत होते.
• पचन सुधारते : पचनसंस्थेशी संबंधित विकारांवर उपचार.