
चालू घडामोडी 03, जुलै 2025 | RAW चे नवे प्रमुख कोण ? | New R&AW Chief

RAW चे नवे प्रमुख कोण ?
New R&AW Chief
Subject : GS - नियुक्ती, संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच 2025 मध्ये रॅा (R&AW) चे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
1. श्री संजीव त्रिपाठी
2. श्री पराग जैन
3. श्री. संजय कुमार वर्मा
4. श्री तपन कुमार डेका
उत्तर : श्री पराग जैन (Parag Jain)
बातमी काय ?
• श्री. पराग जैन यांची रॅा (R&AW) चे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती.

RAW चे प्रमुख आणि RAW बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• केंद्र सरकारने वरिष्ठ IPS अधिकारी श्री पराग जैन (Parag Jain) यांची रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (R&AW) चे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
• श्री पराग जैन यांनी श्री रवी सिन्हा यांची जागा घेतली, ज्यांचा सध्याचा कार्यकाळ 30 जून रोजी संपला.
• श्री पराग जैन हे 1 जुलै 2025 पासून दोन वर्षांच्या निश्चित कार्यकाळासाठी RAW चे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील.
श्री पराग जैन यांबद्दल थोडक्यात माहिती :
• श्री पराग जैन हे 1989 च्या बॅचचे पंजाब कॅडरचे IPS अधिकारी आहेत.
• श्री पराग जैन यांनी पंजाबमध्ये SSP आणि DIG म्हणून काम केले आहे.
• पंजाबमधील त्यांच्या कर्तव्यादरम्यान, त्यांनी अनेक दहशतवादविरोधी कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
श्री पराग जैन यांचा RAW मधील अनुभव :
• श्री पराग जैन यांना पाकिस्तान डेस्क हाताळणे, दहशतवादविरोधी कारवाया आणि डायस्पोरा कट्टरतावाद यांसारख्या विषयांवर सखोल समज आणि अनुभव आहे.
• श्री पराग जैन कॅनडा आणि श्रीलंकेत राजनैतिक भूमिकांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
• कॅनडामधील त्यांच्या पोस्टिंग दरम्यान त्यांनी खलिस्तान समर्थक नेटवर्कचा पर्दाफाश केला.
• त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्येही महत्त्वाचे दहशतवादविरोधी काम केले आहे.
• ऑपरेशन सिंदूरमध्ये गुप्तचर समन्वय आणि धोरणात्मक नियोजनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
ऑपरेशन सिंदूरमधील महत्त्वाची भूमिका :
• 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला.
• भारताने पाकव्याप्त भागात प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केली, ज्याला "ऑपरेशन सिंदूर" असे नाव देण्यात आले.
• एव्हिएशन रिसर्च सेंटर (ARC) चे प्रमुख म्हणून श्री पराग जैन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
• एव्हिएशन रिसर्च सेंटर या संस्थेने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी लपण्याच्या ठिकाणांची गुप्त माहिती गोळा केली होती, त्यानंतर भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वीरित्या पार पाडले.

R&AW बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• R&AW चा फूल फॅार्म Research and Analysis Wing असा आहे.
• स्थापना : 1968
• 1962 च्या भारत - चीन आणि 1965 च्या भारत - पाकिस्तान युद्धानंतर देशासाठी आंतरराष्ट्रीय गुप्तचर बाबी हाताळण्यासाठी एक वेगळी आणि समर्पित संस्थेची गरज भासू लागली यातून रॅा चा जन्म झाला.
• 1968 मध्ये, भारताची पहिली परदेशी गुप्तचर संस्था, Research and Analysis Wing ची स्थापना करण्यात आली.
• पंतप्रधान : R&AW च्या स्थापनेच्या वेळी भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी या होत्या.
• मुख्यालय (Headquarters) : नवी दिल्ली
• बोधवाक्य (Motto) : "धर्मो रक्षति रक्षितः" (Dharmo Rakshati Rakshitah)
• कार्य : भारताची विदेशी गुप्तचर संस्था म्हणून काम करणे, गुप्तचर माहिती गोळा करणे, दहशतवादी घटनांवर लक्ष ठेवणे इत्यादी.
रिसर्च एंड एनालिसिस विंग (R&AW) चे पहिले प्रमुख कोण ?
Who was the first head of RAW ?
• रामेश्वर नाथ काव (Rameshwar Nath Kao) हे रॅाचे पहिले सचिव आहेत.
