
चालू घडामोडी 04, जुलै 2025 | स्वामी विवेकानंद पुण्यतिथी | Death Anniversary of Swami Vivekananda

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी
Death Anniversary of Swami Vivekananda
स्वामी विवेकानंद यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन 🙏💐💐
Subject : GS - दिनविशेष, इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) स्वामी विवेकानंदांनी बेलूर मठात महासमाधी कोणत्या वर्षी घेतली ?
1. 1888
2. 1896
3. 1900
4. 1902
उत्तर : 1902
स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोठे झाला ?
• 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथिल सिमलापल्ली या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला.
स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय ?
• नरेंद्रनाथ दत्त हे स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव आहे.
स्वामी विवेकानंद यांचे गुरू कोण होते ?
• स्वामी रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरू होते.
शिकागो येथील सर्वधर्म परिषद :
• 1893 मध्ये शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माची श्रेष्ठता व उदारता सर्वांना पटवून देण्यासाठी प्रयत्न केले.
• शिकागो येथील आपल्या भाषणाची सुरुवातच स्वामी विवेकानंदांनी बंधू आणि भगिनींनो या शब्दांपासून केली आणि सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडला.
• तीन वर्षे त्यांनी अमेरिका आणि इंग्लंडमध्ये वेदांत तत्त्वज्ञान आणि धर्माचा प्रसार केला.
रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली ?
• स्वामी विवेकानंदांनी आपले गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांची शिकवण समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशनची स्थापना केली.
• कलकत्त्यातील बेलूर मठ हे मुख्यालय आहे.
स्वामी विवेकानंद यांची शिकवण :
• स्वामी विवेकानंदांनी पाश्चात्य शिक्षण आणि हिंदू धर्म यांची योग्य सांगड घालून आत्मसिद्धीचा मार्ग म्हणजे इतरांना मदत करणे हा संदेश जगाला दिला.
• त्यांनी लोकांना नि: स्वार्थ सेवेतून समाजाच्या भल्यासाठी कार्य करण्यास प्रेरित केले.
• जगातील सर्वच धर्म सत्य असून ते एकाच ध्येयाप्रत जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत अशी रामकृष्ण मिशनची शिकवण होती.
• याचे फलित म्हणून अनेक देश- विदेशी अनुयायी त्यांस लाभले.
• उदाहरणार्थ कु. मार्गारिट नोबल या पुढे भगिनी निवेदिता म्हणून प्रसिद्धीस आल्या.
समाजसेवेचे कार्य :
• धार्मिक सुधारणांबरोबर सामाजिक सुधारण्याचीही कार्ये रामकृष्ण मिशननी केली.
• ठिकठिकाणी अनाथाश्रमे, रुग्णालये, विश्रामगृहे यांची स्थापना केली गेली.
• नैसर्गिक आपत्तीच्या काळात संकटग्रस्तांना मदतीचा हात देऊन माणुसकी हाच खरा धर्म आहे ही शिकवण जगाला दिली.
महासमाधी :
• 4 जुलै 1902 या दिवशी रात्री त्यांनी बेलूर मठात महासमाधी घेतली.
राष्ट्रीय युवा दिन केव्हा असतो ?
पहिला राष्ट्रीय युवा दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• भारत सरकारने 1984 मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केला.
• 12 जानेवारी 1985 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला.
• राष्ट्रीय युवा दिवस दरवर्षी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाला, कार्यांना आणि भारतातील तरुणांसाठीच्या त्यांच्या चिरस्थायी दृष्टीला श्रद्धांजली म्हणून साजरा केला जातो.