
चालू घडामोडी 05, जुलै 2025 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाचा सर्वोच्च पुरस्कार | PM Modi Conferred Ghana’s Highest Civilian Honour

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाचा सर्वोच्च पुरस्कार
PM Modi Conferred Ghana’s Highest Civilian Honour
Subject : GS - पुरस्कार, आंतरराष्ट्रीय घडामोडी
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाना सरकारने देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला तर हा घाना देश कोणत्या खंडात आहे ?
1. आशिया
2. अमेरिका
3. आफ्रिका
4. युरोप
उत्तर : आफ्रिका
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या घाना देशाच्या दौऱ्याबद्दल परीक्षेसाठी
IMP वनलाईनर पॉईंट्स :
• पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना जुलै 2025 मध्ये घाना सरकारने देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' (‘The Officer of the Order of the Star of Ghana’) प्रदान केला.
• पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रतिष्ठित राजकारणीपणा आणि प्रभावी जागतिक नेतृत्वाच्या सन्मानार्थ त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
• पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींना आतापर्यंत 24 देशांकडून सर्वोच्च नागरी सन्मान मिळाले आहेत, जे कोणत्याही भारतीय नेत्यासाठी एक विक्रमी कामगिरी आहे.
• पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हा सन्मान भारतातील नागरिकांना समर्पित केला.
• पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच घाना दौरा होता.
• 1995 च्या पी.व्ही. नरसिंह राव यांच्या घाना भेटीनंतर घानाला भेट देणारे ते दुसरे भारतीय पंतप्रधान आहेत.
भारत आणि घाना यांतील सामंजस्य करार :
Memorandum of Understanding (MoU)s between India and Ghana :
• भारत आणि घाना या दोन्ही देशांच्या नेत्यांच्या उपस्थितीत 4 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी आणि देवाणघेवाण करण्यात आली. हे सामंजस्य करार पुढीलप्रमाणे :
1) सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमासाठी सामंजस्य करार
2) मानकीकरण (Standardisation), प्रमाणन (Certification) आणि अनुरूपता मूल्यांकनात (Conformity Assessment) सहकार्य वाढविण्यासाठी घाना मानक प्राधिकरण आणि भारतीय मानक ब्युरो (BIS) यांच्यात सामंजस्य करार
3) पारंपारिक औषधांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी घानाच्या पारंपारिक आणि पर्यायी औषध संस्था आणि भारतीय आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्थेत सामंजस्य करार
4) दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय संवाद संस्थात्मक करण्यासाठी संयुक्त आयोग बैठक (Joint Commission Meeting) स्थापन करण्याबाबत सामंजस्य करार.
घाना देशा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• स्थान : घाना हा आफ्रिका खंडातील एक देश आहे. पश्चिम आफ्रिकेतील गिनीच्या आखाताच्या किनाऱ्यावर घाना वसलेला आहे.
• पूर्वीचे नाव : घानाला पूर्वी गोल्ड कोस्ट म्हणून ओळखले जात असे कारण त्याच्या किनाऱ्यावर भरपूर सोने आढळत होते.
• स्वातंत्र्य : 1957 मध्ये युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचे नाव बदलून घाना करण्यात आले.
• राजधानी : अक्रा (Accra)
• कोको उत्पादक : घाना हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कोको उत्पादक देश आहे.
• आयात : भारत घाना कडून प्रामुख्याने सोन्याची आयात करतो.
• निर्यात : भारत घानाला औषधे, कृषी यंत्रसामग्री, वाहतूक वाहने, विद्युत उपकरणे इत्यादी निर्यात करतो.