कोल्हापुरी चप्पल | Kolhapuri Chappals
Subject : GS - अर्थशास्त्र - GI Tag
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये चर्चेत असलेली कोल्हापुरी चप्पलचे डिझाइन कोणत्या कंपनीने चोरल्याने ती कंपनी वादात सापडली आहे ?
1. पुमा (PUMA)
2. प्राडा (Prada)
3. गुची (Gucci)
4. लुई व्हिटॉन (Louis Vuitton)
उत्तर : प्राडा (Prada)
बातमी काय ?
• इटलीची प्रसिद्ध कंपनी प्राडा (Prada) ने कोल्हापुरी चप्पलचे डिझाइन चोरल्याने एका नव्या वादात सापडली.

प्राडा आणि कोल्हापुरी चप्पलचा वाद काय ?
• मिलान फॅशन वीकमध्ये, इटालियन लक्झरी ब्रँड प्राडाने शतकानुशतके जुन्या कोल्हापुरी चप्पलसारखे दिसणारे लेदर सँडल सादर केले.
• मिलानमधील मेन्स 2026 स्प्रिंग समर शोमध्ये भारतीय चप्पलपासून प्रेरणा घेतलेल्या सँडल (Sandals) होत्या.
• सुरुवातीला, प्राडाने त्यांच्या भारतीय उत्पत्तीचा उल्लेख न करता "लेदर सँडल" असे या चपलेचे वर्णन केले होते.
• असे म्हटले जात होते की इटालियन लक्झरी ब्रँड प्राडा ही चप्पल 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकण्याची योजना आखत होती.
• ही किंमत मूळ कोल्हापुरी चपलेच्या किमतीपेक्षा कितीतरी पट जास्त आहे.
प्राडावर जोरदार टीका :
• या गोष्टीमुळे भारतात खूप नाराजी पसरली.
• याला सांस्कृतिक चोरी मानले जात आहे.
• कारण कोल्हापुरी चप्पलची उत्पत्ती 12 व्या शतकात झाली.
• कोल्हापुरी चप्पलची निर्मिती पारंपारिक चांभार समुदायाच्या लोकांकडून झाली असे मानले जाते.
• कोल्हापुरी चप्पलाला GI टॅग देखील देण्यात आला आहे.
• असे असुनही प्राडाने ही डिझाइन वापरली.
• त्यामुळे सोशल मीडियावर लोक प्राडावर जोरदार टीका करत आहेत.
• कोल्हापूरकरांसोबतच देशभरातूनही प्राडाचा जोरदार विरोध करण्यात आला.
टीकेनंतर प्राडा कंपनीने यावर स्पष्टीकरण :
• माहितीनुसार, सर्व बाजूंनी विरोध झाल्यावर प्राडाने आता मान्य केले आहे की, त्यांच्या स्प्रिंग समर 2026 च्या कलेक्शनमध्ये भारतीय चप्पलपासून प्रेरणा घेतलेल्या सँडल (Sandals) होत्या.
• प्राडाने हे ही सांगितले की सध्या हे कलेक्शन डिझाइनच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि ते बनवायचे की नाही, हे अजून ठरलेले नाही.
• प्राडाने आता भारतीय कारागिरांसोबत मिळून काम करण्याची तयारी दर्शवली आहे.
• प्राडाने म्हटले आहे की, जर त्यांनी कोल्हापुरी चप्पलसारखी सँडल बनवण्याचा आणि विकण्याचा निर्णय घेतला, तर ते भारतीय कारागिरांसोबत काम करू शकतात.
कोल्हापुरी चप्पल कशा बनवल्या जातात ?
• कोल्हापुरी चप्पल एका खास प्रकारच्या अस्सल लेदरपासून बनवली जाते जे अत्यंत टिकाऊ आणि आरामदायी असते.
• यासाठी लेदर प्रथम पाण्यात आणि नैसर्गिक तेलात तासंतास भिजवून मऊ केले जाते.
• नंतर ते हाताने डिझाइन करून नंतर शिवणकाम त्यावर केले जाते.
• त्यात कोणतेही कृत्रिम किंवा रासायनिक घटक वापरलेले नाहीत.
कोल्हापुरी चप्पलची वैशिष्ट्ये कोणती ?
• महाराष्ट्रातील या हस्तनिर्मित चामड्याच्या चपलीला त्याच्या अद्वितीय डिझाइन, टिकाऊपणा आणि आरामासाठी जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.
• कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत या उद्योगाला महत्त्वपूर्ण शाही संरक्षण मिळाले, ज्यांनी कारागिरांना आधार देण्यासाठी 29 टॅनिंग सेंटर्स स्थापन करण्यास मदत केली.
• पूर्वी ही चप्पल मराठा योद्धे आणि ग्रामीण समुदाय वापरत असत.
• त्यांची रचना अशी होती की त्यामुळे उन्हाळ्यात पाय थंड राहत असत आणि पावसात टिकाऊ राहत असत.
• त्यांच्या मजबूत बांधणीमुळे ते विविध भूप्रदेश आणि हवामान परिस्थितीसाठी योग्य बनतात.
• कोल्हापुरी चप्पलमध्ये वापरले जाणारे लेदर कालांतराने तुमच्या पायांच्या आकारात साचेबद्ध होते, ज्यामुळे चप्पल आरामदायी बनते.
कोल्हापुरी चप्पलाला GI टॅग कोणत्या वर्षी मिळाला ?
• 2019 मध्ये, कोल्हापुरी चप्पलाला भौगोलिक संकेत (Geographical Indication- GI) टॅग देण्यात आला.
• हा GI टॅग महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील कारागिरांना संयुक्तपणे देण्यात आला.
भौगोलिक संकेतांक (GI) म्हणजे काय ?
GI टॅग कोणाला देण्यात येतो ?
• GI Tag चा फूल फॅार्म Geographical Indication असा आहे.
• एखाद्या भागातील वस्तू किंवा पदार्थ ही त्या भागाचं वैशिष्ट्य असल्यास त्यास भौगोलिक संकेतांक म्हणजेच GI टॅग देण्यात येतो.
• GI Tag मुळे त्या उत्पादनाची गुणवत्ता आणि ओळख जगभर टिकून राहते.
• Geographical Indication of Goods (Registration and Protection) Act, 1999 हा कायदा भारतातील वस्तूंची संबंधित भौगोलिक संकेतांची नोंदणी आणि उत्तम संरक्षण करण्यास प्रयत्न करतो.