
चालू घडामोडी 08, जुलै 2025 | बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर | Proposal to change name of Bengaluru City University approved

बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर
Proposal to change name of Bengaluru City University approved
Subject : GS
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच, बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून खालील पैकी कोणाच्या सन्मानार्थ ठेवण्यास कर्नाटक मंत्रिमंडळाने मान्यता दिली ?
1. अटलबिहारी वाजपेयी
2. राजीव गांधी
3. डॉ. मनमोहन सिंग
4. नरेंद्र मोदी
उत्तर : डॉ. मनमोहन सिंग
• अलिकडेच, कर्नाटक मंत्रिमंडळाने बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
• कर्नाटक मंत्रिमंडळाने बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून डॉ. मनमोहन सिंग युनिव्हर्सिटी असे ठेवण्यास मान्यता दिली आहे.
• माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात हाती घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या उपक्रमांद्वारे बेंगळुरूच्या पायाभूत सुविधांवर अमुलाग्र बदल झाला.
• बेंगळुरूच्या शहरी आणि शैक्षणिक विकासात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांबद्दल थोडक्यात माहिती :
जन्म आणि शिक्षण :
• 26 सप्टेंबर 1932 रोजी आजच्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गाह या गावात त्यांचा जन्म झाला.
• 1947 च्या फाळणीनंतर डॉ. मनमोहन सिंग कुटुंबियांसोबत पाकिस्तानमधून भारतात पोहोचले.
• घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही त्यांनी पंजाब विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले.
• स्कॉलरशिप मिळवून डॉ. मनमोहन सिंग यांनी केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात जाऊन अर्थशास्त्र विषयात उच्च शिक्षण घेतलं.
देशाच्या आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रवास :
• 1971 मध्ये डॉ. मनमोहन सिंग हे भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले.
• 1972 मध्ये अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्त
• 1976 अर्थ मंत्रालयाचे सचिव
• 1982 ते 1985 भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर
• 1985 ते 1987 नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष
• 1991 मध्ये नरसिंहराव सरकारमध्ये अर्थमंत्री
• 1991 पासून राज्यसभेचे सदस्य
• 1998 ते 2004 दरम्यान राज्यसभेत विरोधी पक्षनेते
• 2004 ते 2009 पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान
• 2009 ते 2014 दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी कार्यभार सांभाळला.
भारताची अर्थव्यवस्था बदलणारे अर्थसरदार डॉ. मनमोहन सिंग :
• 1990-91 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची गाडी रुळावरून पूर्णपणे घसरली होती.
• इराकनं कुवेतवर केलेल्या हल्ल्यामुळे आखाती युद्धाला सुरुवात झाली होती. त्यामुळे तेलाचे दरही गगनाला भिडले होते.
• भारताने अल्पमुदतीची कर्जं भरपूर घेतल्यामुळेही अर्थव्यवस्थेवर ताण आला होता.
• आता देशासमोर असलेला आर्थिक पेच सोडवण्यासाठी एखाद्या विशेष व्यक्ती ची नेमणूक करण्याची गरज असल्याचं तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या लक्षात आलं.
• अशा वेळी नाव समोर आलं ते अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच.
• पहिल्या दिवसापासून अर्थव्यवस्थेचं रुतलेलं चाक बाहेर काढून त्याला गती देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करायचे होते.
• डॉ.मनमोहन सिंह यांनी 1991 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना उदारीकरणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक ठरला.
• त्यांच्या या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्था एका वेगळ्या उंचीवर गेली.
• मनमोहन सिंह यांच्या उदारीकरणाच्या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली.

पुरस्कार आणि सन्मान :
डॉ. मनमोहन सिंग यांना अनेक देश विदेशातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
• 1987 मध्ये भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
• 1993 वित्तमंत्री म्हणून यूरो मनी पुरस्कार
• 1993 आणि 1994 वित्तमंत्री म्हणून आशिया मनी पुरस्कार
• जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी सन्मान
• केम्ब्रिज विद्यापीठाचा अॅडम स्मिथ पुरस्कार