
चालू घडामोडी | International Day of Rural Women | आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन

आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन
International Day of Rural Women
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालील विधानांचा विचार करा आणि दिलेल्या विधानांपैकी योग्य विधान/ विधाने असलेला पर्याय निवडा.
अ) दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन साजरी केला जातो.
ब) हा दिवस ग्रामीण महिलांच्या योगदानाचे महत्त्व आणि त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधतो.
क) 2016 पासून भारतात 15 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय महिला किसान दिवस म्हणून साजरा केला जातो.
1. फक्त अ बरोबर
2. अ आणि ब बरोबर
3. अ आणि क बरोबर
4. अ, ब आणि क बरोबर
उत्तर : अ, ब आणि क बरोबर
• ग्रामीण महिलांच्या योगदानाचे महत्त्व आणि त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन साजरी केला जातो.
• 2007 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने (United Nations General Assembly) आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनाची स्थापना केली.
पहिला आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• 15 ऑक्टोबर 2008 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन का साजरी करतात ?
• ग्रामीण महिलांना भेडसावणाऱ्या समस्या तसेच आव्हानांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी
• हा दिवस लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाची भूमिका अधोरेखित करतो.
• शेती, अन्न सुरक्षा, कुटुंबाचे पालनपोषण आणि ग्रामीण विकासात या महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे.
• ग्रामीण भागातील महिलांच्या कष्टाचे आणि त्यांच्या योगदानाचे महत्त्व पटवून देणारा दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन साजरा केला जातो.
ग्रामीण महिलांना भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या ?
• ग्रामीण भागातील रूढी -परंपरा यांमुळे ग्रामीण महिलांना लैंगिक असमानता आणि भेदभाव यांना सामोरे जावे लागते.
• शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या संधी आणि इतर सामाजिक सेवांमध्ये ग्रामीण महिलांना समान संधी मिळत नाही.
आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन 2025 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
"प्रतिपूरक न्यायासाठी ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण : आफ्रिकेत समावेशक आणि शाश्वत कृषी-अन्न प्रणालींचा विकास."
“Empowering Rural Women for Reparatory Justice: Advancing Inclusive and Sustainable Agri-Food Systems in Africa.”

राष्ट्रीय महिला किसान दिवस
National Women Farmer's Day
• शेतीच्या विविध पैलूंमध्ये महिला शेतकऱ्यांचे योगदान ओळखण्यासाठी दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस भारतात राष्ट्रीय महिला किसान दिवस म्हणून साजरा केला जातो.
• कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून 2016 पासून राष्ट्रीय महिला किसान दिवस साजरा केला जातो.

















