
Current Affairs | संयुक्त राष्ट्र दिवस 2025 | United Nations Day 2025 | चालू घडामोडी

संयुक्त राष्ट्र दिवस
United Nations Day
Subject : GS - दिनविशेष, आंतरराष्ट्रीय संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) संयुक्त राष्ट्र (United Nations) बद्दल खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.
A. 24 ऑक्टोबर 1945 रोजी ही संघटना स्थापन करण्यात आली.
B. भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे.
C. भारत संयुक्त राष्ट्रसंघाचा स्थायी सदस्य (Permanent Members) आहे.
वरीलपैकी कोणता/ कोणते विधान/विधाने बरोबर आहेत.
पर्याय :
1. फक्त A आणि B बरोबर
2. फक्त B आणि C बरोबर
3. फक्त A आणि C बरोबर
4. A, B आणि C बरोबर
उत्तर : फक्त A आणि B बरोबर
• भारत संयुक्त राष्ट्रसंघाचा स्थायी सदस्य (Permanent members) नाही.
बातमी काय ?
• 24 ऑक्टोबर 2025 हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस (United Nations Day) जगभरात साजरा केला गेला.
• 2025 हे संयुक्त राष्ट्रांच्या 80 व्या वर्धापन दिनाचे वर्ष आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ (United Nations) बद्दल Most Important वनलाईनर पॉईंट्स :
• संयुक्त राष्ट्र ही विविध देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आंतरराष्ट्रीय संघटना आहे.
• दुसऱ्या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी ही संघटना स्थापन करण्यात आली.
• जगाला पुन्हा एकदा महायुद्धाला सामोरे जावे लागू नये, हा या संघटनेच्या स्थापनेमागचा मुख्य हेतू होता.
• भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे.
• सध्या संयुक्त राष्ट्रसंघात 193 सदस्य देश आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे ?
• मुख्यालय (Headquarters) : अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख उद्दिष्टे कोणती ?
संयुक्त राष्ट्रसंघ काय काम करते ?
• विविध देशांमध्ये शांतता, सलोखा आणि सुरक्षा टिकविणे.
• मानवी हक्कांचे संरक्षण, सामाजिक व आर्थिक विकास.
• पर्यावरणाचे संवर्धन आणि दुष्काळ, नैसर्गिक संकट आणि युद्धाच्या काळात मानवतेच्या भूमिकेतून मदत करणे, मानवतावादी सहाय्य प्रदान करणे.
• आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करणे ही या संघटनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख घटक कोणते ?
What are the Different Organs of the United Nations ?
संयुक्त राष्ट्रसंघाचे 5 प्रमुख घटक आहेत :
1. संयुक्त राष्ट्र महासभा (United Nations General Assembly)
2. सुरक्षा परिषद (Security Council)
3. संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषद (United Nations Economic and Social Council)
4. आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice)
5. संयुक्त राष्ट्रांचे सचिवालय (United Nations Secretariat)

1. संयुक्त राष्ट्र महासभा (United Nations General Assembly)
• संघटनेची मुख्य धोरणे बनवणारी संस्था आहे.
• यात सर्व सदस्य राष्ट्रांचा समावेश असून, हे संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरमध्ये समाविष्ट असलेल्या आंतरराष्ट्रीय समस्यांबद्दल चर्चा करते.
• UN महासभेत 193 सदस्य राष्ट्रांपैकी प्रत्येकाला समान मत आहे.
2. सुरक्षा परिषद (Security Council)
• सुरक्षा परिषद ही शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेणारी समिती आहे.
• सुरक्षा परिषदेत 15 सदस्य असतात - 5 स्थायी सदस्य आणि 10 अस्थायी सदस्य.
• 5 स्थायी सदस्य (Permanent Members) चीन, फ्रान्स, रशियन फेडरेशन, युनायटेड किंगडम आणि संयुक्त अमेरिका
• आणि 10 अस्थायी सदस्य (Non-Permanent Members) 2 वर्षांसाठी निवडले जातात.
(नोट : भारत संयुक्त राष्ट्रसंघाचा स्थायी सदस्य (Permanent Members) नाही.)
3. संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषद (United Nations Economic and Social Council)
• आंतरराष्ट्रीय आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत विविध देशांत सहकार्य वाढवून विकास साधण्यासाठी
• आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यांवरील समन्वय, धोरण पुनरावलोकन, धोरणात्मक संवाद आणि शिफारसींसाठी ही प्रमुख संस्था आहे.
4. आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice)
हे एकमेव आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे जे 193 UN सदस्य देशांमधील वाद सोडवते.
5. संयुक्त राष्ट्रांचे सचिवालय (United Nations Secretariat)
सुरक्षा परिषदेच्या शिफारशीवर आधारित संयुक्त राष्ट्र महासभा द्वारे महासचिवाची नियुक्ती केली जाते आणि ते संघटनेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतात.





















