
चालू घडामोडी | सखारोव पुरस्कार | Sakharov Prize

सखारोव पुरस्कार
Sakharov Prize
Subject : GS - पुरस्कार - आंतरराष्ट्रीय पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) सखारोव पुरस्कार खालील पैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
1. विज्ञान व तंत्रज्ञान
2. मानवाधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य
3. पर्यावरण संरक्षण
4. वैद्यकीय संशोधन
उत्तर : मानवाधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य
बातमी काय ?
• अलिकडेच, युरोपीय संघाने 2025 सालचा सर्वोच्च मानवाधिकार सन्मान ‘सखारोव पुरस्कार’ (Sakharov Prize) बेलारूसचे आंद्रेज पोजोबुत (Andrzej Poczobut) आणि जॉर्जियाची म्झिया अमाग्लोबेली (Mzia Amaghlobeli) यांना प्रदान करण्याची घोषणा केली आहे.
सखारोव पुरस्काराची स्थापना कोणी आणि केव्हा केली ?
सखारोव पुरस्कार कोणत्या संस्थेमार्फत दिला जातो ?
• स्थापना : 1988 साली युरोपियन संसदेमार्फत (European Parliament) सखारोव पुरस्काराची स्थापना करण्यात आली.
• स्मरणार्थ : सोविएत वैज्ञानिक आणि नोबेल शांतता पारितोषिक विजेते आंद्रेई सखारोव (Andrei Sakharov) यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो.

सखारोव पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
सखारोव पुरस्कार कोणाला देण्यात येतो ?
• मानवाधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी असामान्य योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला ‘सखारोव पुरस्कार’ (Sakharov Prize) देण्यात येतो.
• प्रमुख विजेते : नेल्सन मंडेला (दक्षिण आफ्रिका), मलाला युसुफझाई (पाकिस्तान), डेनिस मुकवेगे (काँगो) इत्यादी.
• पुरस्काराची रक्कम : 50,000 युरो (सुमारे 45 लाख रुपये)
सखारोव पुरस्कार 2025 विजेत्यांबद्दल परीपरीक्षेसाठी थोडक्यात माहिती :
आंद्रेज पोजोबुत (Andrzej Poczobut) :
• आंद्रेज पोजोबुत हे बेलारूसचे प्रसिद्ध पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते आहे.
• लोकशाही आंदोलन आणि प्रसारमाध्यम स्वातंत्र्यासाठी त्यांनी सतत लढा दिला.
• शासनविरोधी लेखनामुळे खोट्या आरोपांवर आंद्रेज पोजोबुत यांना 8 वर्षांची कैद झाली.

म्झिया अमाग्लोबेली (Mzia Amaghlobeli) :
• म्झिया अमाग्लोबेली या जॉर्जियातील प्रसिद्ध पत्रकार आणि स्वतंत्र माध्यम संस्थांच्या संस्थापक आहेत.
• त्यांनी दोन स्वतंत्र मीडिया आऊटलेट्सची स्थापना करून जनतेपर्यंत सत्य आणि निष्पक्ष बातम्या पोहोचवल्या.
• शासन दडपशाही आणि सेन्सॉरशिपविरुद्ध निर्भीड पत्रकारिता त्यांनी केली.
• ऑगस्ट 2025 मध्ये पोलिस प्रमुखाला चापट मारल्याच्या आरोपाखाली त्यांना 2 वर्षांची शिक्षा झाली.

कार्य आणि योगदान :
• दोन्ही पत्रकारांनी सत्तेच्या विरोधात सत्य बोलण्याचे आणि न्यायासाठी उभे राहण्याचे धैर्य दाखवले.
• त्यांनी हे सिद्ध केले की पत्रकारिता हा गुन्हा नसून लोकशाहीचा आत्मा आहे.
• या दोघांना ‘सखारोव पुरस्कार’ देऊन जगभरातील पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या साहसाला सन्मान देण्यात आला आहे.





















