
चालू घडामोडी | मोंथा चक्रीवादळ | Cyclone Montha

मोंथा चक्रीवादळ
Cyclone Montha
Subject : GS - भूगोल - हवामान : चक्रीवादळ
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच आंध्र प्रदेश, ओडिशा व तामिळनाडू या राज्यांमध्ये तडाखा देणाऱ्या “मोंथा” चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने सुचवले आहे ?
1. भारत
2. बांग्लादेश
3. श्रीलंका
4. थायलंड
उत्तर : थायलंड
बातमी काय ?
• बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोंथा चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा तामिळनाडू या राज्यांच्या किनारपट्टी भागांमध्ये आणि महाराष्ट्रातही काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि वादळी वारे अनुभवास आले.
मोंथा चक्रीवादळ बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• मोंथा हे एक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ (Tropical Cyclone) आहे.
• बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे चक्रीवादळ तयार झाले.
• या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तामिळनाडू राज्यांतील किनारी भागांमध्ये मुसळधार पाऊस व जोरदार वारे झाले.
• 28 ऑक्टोबर 2025 रोजी या वादळाने “Severe Cyclonic Storm” चे रूप घेतले.
चक्रीवादळाला “मोंथा” हे नाव कोणी दिले ?
Who gave the name Montha to cyclone ?
• चक्रीवादळाला “मोंथा (Montha)” हे नाव थायलंड ने दिले आहे.
• “मोंथा” हा थाई भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ – “सुगंधी फूल” किंवा “सुंदर फूल” (Fragrant / Beautiful Flower) असा आहे.
चक्रीवादळाला नाव का देण्यात येते ?
Why are cyclones given names ?
• सामान्य लोकांना हवामानाची माहिती किंवा इशारा देताना केवळ वादळाची आकडेवारी किंवा तांत्रिक संज्ञांऐवजी नावं वापरणं सोपं जातं त्याचप्रमाणे हवामान तज्ज्ञ व त्याविषयी काम करणाऱ्या सर्वांना संवाद करण्यास सोपे जावे म्हणून चक्रीवादळाचे नामकरण केले जाते.
चक्रीवादळांना नाव कोण देतात ?
Who gives the name to cyclone ?
• WMO (वर्ल्ड मेटिरिओलॉजिकल ऑर्गनायजेशन) ही संयुक्त राष्ट्राची एक संघटना आहे. त्यांनी जगभरातील वादळांची नावं ठेवण्यासाठी एक पद्धत ठरवली आहे.
• उत्तर हिंद महासागरातील चक्री वादळंना , उष्णकटिबंधीय चक्रीवादळ प्रादेशिक संस्था (Tropical Cyclone Regional Body) द्वारे नाव देण्यात येते.
• उष्णकटिबंधीय चक्रीवादळ प्रादेशिक संस्था (TCRB) ही 13 देशांनी मिळून बनलेली संस्था आहे.
• या संस्थेत बांगलादेश, भारत,पाकिस्तान, मालदीव, म्यानमार, , श्रीलंका, ओमान, थायलंड, इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या 13 देशांचा समावेश आहे.
• एखाद्या प्रदेशातील सदस्य देश त्यांच्यातर्फे नावं सुचवतात आणि विशिष्ठ क्रमानं त्याच नावांमधून चक्रीवादळाला नावं दिलं जातं.
• नावे उच्चारायला बऱ्याचदा सोपी असतात, सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित असतात.
चक्रीवादळ म्हणजे काय ? आणि ते कसे तयार होतात ?
What is a cyclone and how is it formed?
• काही स्थानिक कारणांमुळे एकाएकी हवेच्या दाबात बदल होऊन मध्यभागी कमी दाबाचे केंद्र निर्माण होते आणि त्याच्या सभोवती हवेचा जास्त दाब होत जातो. यामुळे वारे चक्राकार गतीने कमी दाबाच्या केंद्राकडे वेगाने आकर्षिली जातात, त्याच आवर्त किंवा चक्रीवादळ असे म्हणतात.
• चक्रीवादळे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने (Anti-Clockwise) फिरतात
• चक्रीवादळे दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या दिशेने (Clockwise) फिरतात.
चक्रीवादळांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते ते पुढीलप्रमाणे :
• हिंदी महासागरातील वादळाला चक्रीवादळ (Cyclone) म्हटले जाते.
• वेस्ट इंडिज आणि अटलांटिकमधील वादळाला हरिकेन (Hurricane) नावाने ओळखले जाते
• पॅसिफिक महासागर व चिनी समुद्रातील वादळाला टायफून (Typhoon) या नावाने ओळखले जाते.
• ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावरील वादळाला विली-विली (Willy-Willy) या नावाने ओळखले जाते.
(नोट : वरील ठिकाणे आणि चक्रीवादळांना तेथे काय म्हणतात हे लक्षात ठेवा पेपर ला बरोबर जोडी कोणती असे प्रश्न विचारले जातात.)























