
चालू घडामोडी | महाराष्ट्रात " विद्यार्थी दिन " केव्हा असतो ?

Maharashtra Student Day
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महाराष्ट्रात विद्यार्थी दिन केव्हा साजरी करण्यात येतो ?
1. 14 एप्रिल
2. 2 नोव्हेंबर
3. 7 नोव्हेंबर
4. 14 नोव्हेंबर
उत्तर : 7 नोव्हेंबर
बातमी काय ?
• महाराष्ट्रामध्ये 7 नोव्हेंबर हा दिवस 'विद्यार्थी दिन' म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्रात विद्यार्थी दिन कोणाच्या सन्मानार्थ साजरी करतात ?
• 7 नोव्हेंबर 1900 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथमच शाळेत प्रवेश घेतला.
• हा दिवस त्यांच्या शिक्षण प्रवासाचा प्रारंभ मानला जातो, ज्यातून पुढे त्यांनी सामाजिक न्याय, समानता आणि शिक्षणाच्या हक्कासाठी आयुष्य समर्पित केले.
• त्यांच्या या शैक्षणिक प्रवासाचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2017 मध्ये 7 नोव्हेंबर हा दिवस अधिकृतपणे महाराष्ट्रात “विद्यार्थी दिवस” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्र विद्यार्थी दिनाचे उद्देश (Objectives) :
• विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, परिश्रमाची किंमत, आणि डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या शिक्षण संदेशाची जाणीव करून देणे.
• शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण, प्रबोधन आणि जागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे.
• समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क मिळावा हा संदेश बळकट करणे.
महाराष्ट्र विद्यार्थी दिनाचे महत्त्व (Significance) :
• विद्यार्थी दिन हा फक्त एक औपचारिक सण नाही, तर शिक्षणाच्या मूल्यांचा उत्सव आहे.
• तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणातून सामाजिक परिवर्तन घडविण्याच्या विचारधारेचा गौरव करतो.
• विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणातून समाजात सकारात्मक बदल घडविण्यास प्रेरित करतो.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांबद्दल थोडक्यात माहिती :
• जन्म : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14,एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला.
• शिक्षण : त्यांनी सातारा येथील स्थानिक सरकारी शाळेत शालेय शिक्षण घेतले.
• 1907 मध्ये मॅट्रिक पूर्ण केल्यानंतर, त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयातून B.A. केले.
• कोलंबिया विद्यापीठातून " प्राचीन भारतातील व्यापार " या विषयांवर त्यांनी सन 1915 मध्ये प्रबंध लिहिला आणि त्यांनी M.A ची पदवी प्राप्त केली.
• 1916 मध्ये त्यांनी ‘भारताचा राष्ट्रीय लाभांश - एक ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास’ हा प्रबंध लिहिला आणि Ph.D. पदवी मिळवली.
• डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून अर्थशास्त्रात D.Sc. ही पदवी मिळवली.

🧐 पण तुम्हाला माहिती आहे का ?
जागतिक विद्यार्थी दिन (World Students' Day) केव्हा आणि कोणत्या भारतीय व्यक्ती च्या सन्मानार्थ साजरी करण्यात येतो ?
• प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस राष्ट्रीय नवोपक्रम दिन (National Innovation Day) आणि जागतिक विद्यार्थी दिन (World Students' Day) म्हणून साजरी केला जातो.











![[ karkrogachi pramukh lakshane, vegane vajan kami hone, satyatane yenara khokla, raktasarav, raktachya gathi hone, potat dukhne, kayam thakva janavane, वेगाने वजन कमी होणे, सातत्याने येणारा खोकला, रक्तस्त्राव, रक्ताच्या गाठी येणे, कायम थकवा जाणवने, पोटात दुखणे इत्यादी. ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Cancer_Symptomps_1731313743199.webp)
![[ sthanacha karkrog, breast cancer, tondacha karkrog, mouth cancer, ghasyacha karkrog, throat cancer, fufusyacha karkrog, lung cancer ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Types_of_Cancer_1731313683225.webp)





