
चालू घडामोडी | “वंदे मातरम्” या गीताला 150 वर्ष पूर्ण | 150th Anniversary of India’s National Song

“वंदे मातरम्” या गीताला 150 वर्ष पूर्ण
150th Anniversary of India’s National Song
Subject : GS - दिनविशेष, राज्यशास्त्र, इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2025 या वर्षी “वंदे मातरम्” या गीताला 150 वर्ष पूर्ण झाले तर हे गीत खालील पैकी कोणी लिहिले ?
(सरळसेवा भरती, महाराष्ट्र पोलिस, SSC CHSL 2021,...)
1. बंकिमचंद्र चॅटर्जी
2. रविंद्रनाथ टागोर
3. बिपिन चंद्र पाल
4. मादाम भिकाजी कामा
उत्तर : बंकिमचंद्र चॅटर्जी

बातमी काय ?
• 7 नोव्हेंबर 2025 रोजी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेल्या “वंदे मातरम्” या गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राजभवनात ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.
• बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 'वंदे मातरम्' हे गीत, 7 नोव्हेंबर 1875 रोजी लिहिले.
• पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी “वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताच्या 150 वर्षपूर्तीच्या वर्षभर चालणाऱ्या सोहळ्याचे उद्घाटन नवी दिल्ली येथे केले.
• हा कार्यक्रम भारताच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान म्हणून वर्षभर विविध ठिकाणी साजरा केला जाणार आहे.
“वंदे मातरम्” हे गीत कोणी लिहिले ?
(सरळसेवा भरती, महाराष्ट्र पोलिस, SSC CHSL 2021,...)
• “वंदे मातरम्” हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले गीत आहे, जे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रभक्तीचे प्रतीक बनले.
• "आई, मी तुला वंदन करतो" असा “वंदे मातरम्” याचा अर्थ आहे.
• बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेले 'वंदे मातरम्' हे गीत, 7 नोव्हेंबर 1875 रोजी 'बंगदर्शन' या साहित्यविषयक नियतकालिकेत पहिल्यांदा प्रकाशित झाले होते.
• त्यानंतर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे प्रार्थना गीत, 1882 मध्ये प्रकाशित झालेल्या, 'आनंदमठ' या आपल्या अजरामर कादंबरीत समाविष्ट केले.
“वंदे मातरम्” हे गीत सर्व प्रथम कोणी गायले ?
• 1896 मध्ये कोलकाता येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा “वंदे मातरम्” हे गीत गायले होते.
“वंदे मातरम्” पहिल्यांदा राजकीय घोषणा म्हणून वापर कोणत्या चळवळीसाठी आणि केव्हा करण्यात आला ?
• 7 ऑगस्ट 1905 रोजी कलकत्त्याच्या टाऊन हॉलमध्ये विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीत वंदे मातरम्”चा वापर पहिल्यांदा राजकीय घोषणा म्हणून करण्यात आला, ज्यामुळे बंगालमध्ये स्वदेशी आणि फाळणीविरोधी चळवळीला सुरुवात झाली.
• 1907 मध्ये मॅडम भिकाजी कामा यांनी जर्मनीतील स्टुटगार्ट येथे भारताचा तिरंगा फडकवला; त्या ध्वजावर “वंदे मातरम्” हे शब्द लिहिलेले होते.
संविधान सभेने “वंदे मातरम्” हे गीत भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून केव्हा स्वीकारले ?
• 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने “वंदे मातरम्” हे गीत भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले.
बंकिमचंद्र चॅटर्जी यांबद्दल थोडक्यात माहिती :
• बंकिमचंद्र चॅटर्जी (1838–1894) हे 19 व्या शतकातील बंगालमधील सर्वात प्रतिष्ठीत व्यक्तीमत्वांपैकी एक होते.
• 19 व्या शतकातील बंगालच्या बौद्धिक आणि साहित्यिक इतिहासात त्यांची महत्वाची भूमिका बजावली आहे.
• बंकिमचंद्र चॅटर्जी यांचा एक नामवंत कादंबरीकार, कवी आणि निबंधकार म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानाचा आधुनिक बंगाली गद्य साहित्याच्या विकासावर, तसेच उदयाला येत असलेल्या भारतीय राष्ट्रवादाच्या अभिव्यक्तीवर विलक्षण प्रभाव आहे.
साहित्य :









![[ karkrogachi pramukh lakshane, vegane vajan kami hone, satyatane yenara khokla, raktasarav, raktachya gathi hone, potat dukhne, kayam thakva janavane, वेगाने वजन कमी होणे, सातत्याने येणारा खोकला, रक्तस्त्राव, रक्ताच्या गाठी येणे, कायम थकवा जाणवने, पोटात दुखणे इत्यादी. ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Cancer_Symptomps_1731313743199.webp)
![[ sthanacha karkrog, breast cancer, tondacha karkrog, mouth cancer, ghasyacha karkrog, throat cancer, fufusyacha karkrog, lung cancer ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Types_of_Cancer_1731313683225.webp)










