
चालू घडामोडी | राष्ट्रीय विधी सेवा दिन | National Legal Services Day

राष्ट्रीय विधी सेवा दिन
National Legal Services Day
Subject : GS - दिनविशेष, राज्यशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय विधी सेवा दिना ( National Legal Services Day) बद्दल योग्य विधान असलेला पर्याय निवडा.
1. राष्ट्रीय विधी सेवा दिन दरवर्षी 9 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.
2. या दिनाचा उद्देश समाजातील दुर्बल घटकांना विनामूल्य कायदेशीर मदत आणि समर्थन प्रदान करणे हे आहे.
3. दोन्ही योग्य
4. दोन्ही अयोग्य
उत्तर : दोन्ही योग्य
• राष्ट्रीय विधी सेवा दिन दरवर्षी 9 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.
राष्ट्रीय विधी सेवा दिन केव्हा पासून आणि का साजरी करण्यात येतो ?
• राष्ट्रीय विधी सेवा दिन, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 1995 मध्ये सुरू केला, ज्याचा उद्देश समाजातील दुर्बल घटकांना विनामूल्य कायदेशीर मदत आणि समर्थन प्रदान करणे हे आहे.
• हा दिवस कायदेशीर जागरूकता वाढवण्यासाठी आणि सर्व नागरिकांसाठी, विशेषत: उपेक्षित समुदायातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो.
• उद्दिष्ट : या दिवसाचे मूळ उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा, विशेषतः ज्यांना कायदेशीर सेवा घेणे परवडत नाही, अशा समाजघटकांना मदतीचा हात देणे.
• ही कायदेशीर मदत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत पुरविल्या जातात.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण ( National Legal Services Authority) म्हणजे काय ?
• स्थापना : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणा ची स्थापना 1995 मध्ये विधी सेवा प्राधिकरण कायदा, 1987 (Legal Services Authorities Act, 1987) अंतर्गत करण्यात आली.
• प्रमुख कार्ये (Major Functions) :
‣ समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, महिला, मुले, दिव्यांग, अनुसूचित जाती-जमाती यांना मोफत कायदेशीर मदत प्रदान करणे.
‣ लोकअदालती (Lok Adalats) आयोजित करून लहान वादांचे तडजोडीने निवारण करणे.
‣ कायदेशीर साक्षरता अभियान राबवून नागरिकांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांची माहिती देणे.
‣ कायदेशीर सहाय्य संस्था, स्वयंसेवी संस्था, वकिलांचे मंडळ यांच्याशी समन्वय साधून “सर्वांसाठी न्याय” (Justice for All) हे उद्दिष्ट साध्य करणे.
• मुख्यालय : त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
• मुख्य संरक्षक : भारताचे सरन्यायाधीश हे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य संरक्षक (Chief Patron) आहेत.
• कार्यकारी अध्यक्ष : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्षपदावर सर्वोच्च न्यायालयाच्या दुसऱ्या सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशाची नियुक्ती करण्याची परंपरा आहे.















![[ karkrogachi pramukh lakshane, vegane vajan kami hone, satyatane yenara khokla, raktasarav, raktachya gathi hone, potat dukhne, kayam thakva janavane, वेगाने वजन कमी होणे, सातत्याने येणारा खोकला, रक्तस्त्राव, रक्ताच्या गाठी येणे, कायम थकवा जाणवने, पोटात दुखणे इत्यादी. ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Cancer_Symptomps_1731313743199.webp)
![[ sthanacha karkrog, breast cancer, tondacha karkrog, mouth cancer, ghasyacha karkrog, throat cancer, fufusyacha karkrog, lung cancer ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Types_of_Cancer_1731313683225.webp)



